गोंडा/उत्तरप्रदेश:
२३ मे या लोकसभा निवडणुकीच्या मजमोजणीच्या दिवशी संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अभूतपूर्व विजयश्री मिळत असताना उत्तर प्रदेशातील गोंडा या शहरात मुस्लीम कुटुंबात झालेला बालकाचा जन्म हा पंतप्रधान मोदींच्या विजयोत्सवाचा साक्षीदार ठरला आहे. ही स्मृती कायमस्वरूपी जपत या मुस्लीम कुटुंबाने आपल्या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले.
मुस्लीम कुटुंबातील या बालकाचा जन्म २३ मे या लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशीच झाला.मुस्ताक अहमद पुत्र मोहम्मद इदरीस यांच्या घरी २३ मी च्या दिवशी एक गोंडस बाल जन्माला आले.त्यांचे नाव काय ठेवायचे या वरून चर्चा सुरु असतांना आईने आपल्या बाळाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवणार असल्याचे सांगितले , त्यानंतर या नावाला घरच्यांचा विरोध झाला. मात्र मग दुबईत नौकरी करणाऱ्या पतीला फोन वरून नरेद्र मोदी नाव ठेवणार असल्याचे सांगताच त्यांनी हि त्या नावाला पसंती दर्शविली.
प्रसूता मैनाज बेगम म्हणत कि मोदिजी हे चांगले काम करत आहेत आणि त्यांनी तीन तलाकवर जो नवीन कायदा केला तो मुस्लीम महिलांसाठी चांगला कायदा आहे. यावर समाज काय बोलेल मला काही परवा नाही हा माझा वयाक्तीक निर्णय आहे असे ते म्हणाले. या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवत या मुस्लीम कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रती आपले प्रेम प्रकट करत सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे उदाहरण समाजापढे ठेवले आहे.