Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट ०५, २०२०

अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले

अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले



मा.देवेंद्र फडणवीस यांची भावना; प्रदेश कार्यालयात झाला आनंदोत्सव

अयोध्या येथे राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आले. या क्षणाचा साक्षीदार होता आले, ही भाग्याची गोष्ट आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



राम मंदिर भूमीपूजनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या आनंदोत्सव प्रसंगी मा. फडणवीस बोलत होते. या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील, राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री विनोद तावडे , आशिष शेलार आदी उपस्थित होते.

मा.फडणवीस म्हणाले की, प्रभू रामचंद्र हे देशाचे आराध्य दैवत आहे.सामान्य माणसातील पौरुषत्व जागे करून असुरी शक्तींचा पराभव करणाऱ्या प्रभू रामचंद्राने आदर्श राज्य कसे करावे हेही दाखवून दिले.अशा प्रभू रामचंद्रांचे मंदिर अयोध्येत व्हावे हे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.हा क्षण ' याची देहा याची डोळा' अनुभवता आल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो.
यावेळी उपस्थित मान्यवराच्या हस्ते रामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

भूमिपूजना निमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात भजनाचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवार, मे २५, २०१९

धक्कादायक: धर्म मुस्लीम अन नाव नरेंद्र दामोदरदास मोदी

धक्कादायक: धर्म मुस्लीम अन नाव नरेंद्र दामोदरदास मोदी

गोंडा/उत्तरप्रदेश:
२३ मे या लोकसभा निवडणुकीच्या मजमोजणीच्या दिवशी संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अभूतपूर्व विजयश्री मिळत असताना उत्तर प्रदेशातील गोंडा या शहरात मुस्लीम कुटुंबात झालेला बालकाचा जन्म हा पंतप्रधान मोदींच्या विजयोत्सवाचा साक्षीदार ठरला आहे. ही स्मृती कायमस्वरूपी जपत या मुस्लीम कुटुंबाने आपल्या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले. 

मुस्लीम कुटुंबातील या बालकाचा जन्म २३ मे या लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशीच झाला.मुस्ताक अहमद पुत्र मोहम्मद इदरीस यांच्या घरी २३ मी च्या दिवशी एक गोंडस बाल जन्माला आले.त्यांचे नाव काय ठेवायचे या वरून चर्चा सुरु असतांना आईने आपल्या बाळाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवणार असल्याचे सांगितले , त्यानंतर या नावाला घरच्यांचा विरोध झाला. मात्र मग दुबईत नौकरी करणाऱ्या पतीला फोन वरून नरेद्र मोदी नाव ठेवणार असल्याचे सांगताच त्यांनी हि त्या नावाला पसंती दर्शविली. 

प्रसूता मैनाज बेगम म्हणत कि मोदिजी हे चांगले काम करत आहेत आणि त्यांनी तीन तलाकवर जो नवीन कायदा केला तो मुस्लीम महिलांसाठी चांगला कायदा आहे. यावर समाज काय बोलेल मला काही परवा नाही हा माझा वयाक्तीक निर्णय आहे असे ते म्हणाले. या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवत या मुस्लीम कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रती आपले प्रेम प्रकट करत सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे उदाहरण समाजापढे ठेवले आहे. 
कॉकरेल ब्रॉयलर गावरान फीड उपलब्ध 
संपर्क:9175937925
आमच्याकडे सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड तसेच डेअरीफीड  उपलब्ध 
संपर्क:9175937925

रविवार, जुलै २९, २०१८

आज प्रदर्शित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या बालपणावर आधारीत शॉर्ट फिल्‍म 'चलो जीते है'

आज प्रदर्शित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या बालपणावर आधारीत शॉर्ट फिल्‍म 'चलो जीते है'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या बालपणावर आधारीत शॉर्ट फिल्‍म 
'चलो जीते है' आज रात्री ९ वाजता स्टार टीव्हीच्या सर्व चॅनलवर
पंतप्रधान मोदी यांच्‍या बालपणावर आधारीत ही शॉर्ट फिल्‍म आहे. बालपणी विवेकानंदांच्‍या विचारांनी नरेंद्र मोदी कसे प्रभावित झाले व त्‍यांना कोणासाठी जगावे, या प्रश्‍नाने कसे झपाटले होते, हे या शॉर्ट फिल्‍ममध्‍ये दाखवण्‍यात आले आहे.  
महावीर जैन, भूषण कुमार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. मंगेश हडावळे यांनी ही शॉर्ट फिल्‍म दिग्‍दर्शित केली असून आनंद एल. रॉय आणि महावीर जैन या लघुपटाचे सादरीकरण करत आहेत. 29 जुलै रोजी जवळपास 32 मिनिटांची ही शॉर्ट फिल्‍म रिलीज होणार आहे.