ललित लांजेवार/नागपूर:
चंद्रपुरातील सिपेट प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या जवळपास ४० विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली.या सर्व विद्यार्थ्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्याची ओळख लवकरच महाराष्ट्रातील प्लास्टिक इंडस्ट्रीला मनुष्यबळ पुरविणारी नगरी म्हणून व्हावी यासाठी कौशल्ययुक्त भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास व मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या केमिकल आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयांतर्गत रसायनिक खते विभागाच्या सिपेट चंद्रपूर येथे सुरु करण्यात आले होते.
या प्रशिक्षण संस्थेत विविध जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी येथे प्रशिक्षणासाठी येत असतात.त्यांना राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था याच ठिकाणी केली असते.अशातच काल रात्रीच्या सुमारास मेस मधून जेवण आले.जेवण झाल्यानंतर अचानक विद्यार्थ्यांना उलट्या व मळमळ सुरु झाली.त्यानंतर प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले.सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती बरी असली तरी मात्र विद्यार्थ्यांनी चांगले जेवण मिळत नसल्याची तक्रार करत चांगल्या दर्ज्याचे जेवण पुरविण्याची मागणी केली आहे.
सर्व प्रकरचे पोल्ट्री फीड उपलब्ध |