नागपूर/ललित लांजेवार:
राजुरा येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणात आज शुक्रवारी राजुरा न्यायालयाने माजी आमदार सुभाष धोटे व त्यांचे बंधु नगराध्यक्ष अरुण धोटे यांना जामीन मंजूर केला.
स्थानिक कल्याण नर्सिंग कॉलेजच्या एका विद्यार्थीनीने आपला विनयभंग झाला असुन संस्थेचे अध्यक्ष व सचिव धोटे बंधूकडे तक्रार करुनही दखल न घेतल्याची तक्रार चंद्रपूर पोलीस अधिक्षक यांचेकडे केली होती. या प्रकरणाची मुख्य आरोपी निसटता धोटेबंधुना जेलची हवा खावी लागली होती.या प्रकरणात राजुरा पोलीसांनी सहा आरोपींविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
याच प्रकरणात निर्णय देतांना माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना न्यायालयाने २१ मे २०१९ रोजी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. याप्रकरणाचा तपास सुरु असतानाच सुभाष घोटे व राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याविरुद्ध बळजबरीने तक्रार द्यायला लावली असल्याचा खळबळजनक आरोप तक्रारकर्त्या पीडित मुलीने चंद्रपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन केला होता.
मला मनसेच्या काही नेत्यांनी पाच लाख रुपयांचे आमिष दिले व धोटे बंधुंविरोधात तक्रार करायचे भाग पाडले.मी पैश्याच्या मोहात तक्रार केली मात्र वृत्तपत्र व टीव्हीवर बातम्या बघितल्या नंतर मला धक्काच बसला.. मी अशा पद्धतीची कोणती तक्रार केली नसतानासुद्धा अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. यावरून मनसेचे राजू कुकडे, राजुरा येथील गोमती पाचभाई ,मनसे महिला जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी माझ्यावर दबाव टाकत माझ्याकडून अश्या प्रकारचे काम करून घेतल्या गेले.
घरच्यांनी मला विचारले असता मी अशा पद्धतीचे खयाण दिले नाहो. मला अशापद्धतीने त्यांनी बळजबरीने हे करायला लावले. मला पाच लाख रुपयांचे आमिष दिले. हे घरी सर्वांना सांगितले. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. यामध्ये संस्थाध्यक्ष सुभाष थोटे, सचिव अरुण थोटे त्यांचा ड्रायव्ह व इतर कुणाचाही हस्तक्षेप नाही, असे स्पष्टीकरणही पीडिताने पत्रपरिषदेत दिले.या प्रकरणात आता धोटे जामिनावर बाहेर येताच आम्हाला फसविणाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
धोटे बंधूंना जामीन मंजूर होताच काँग्रेसच्या कार्यकर्तामध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. जामिनीवर बाहेर येताच धोटे बंधूनी हात उंचावून सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन केले. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्तांनी पोलीस स्टेशन गाठून खोटी तक्रार दाखल करणाऱ्याच्या मनसेचे राजू कुकडे, राजुरा येथील गोमती पाचभाई व चंद्रपूर येथील मनसे महिला जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राजुरा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदनही राजुरा पोलिसांना देण्यात आले आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध |