Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०७, २०१९

चंद्रपुरात अवैध सावकाराने कर्जदाराच्या कुटुंबियांना जिवंत पेटविले

नागपूर/ललित लांजेवार: 

एका अवैध सावकाराने कर्जदाराने वेळेवर कर्जाचे पैसे परत न केल्याने कर्जदाराच्या कुटुंबालाच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरात समोर आली आहे. 

मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील सरकार नगर येथे हि घटना घडली.येथे राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अवैध सावकार जसबीर भाटीया उर्फ सोनू याच्याकडून तीन लाख रुपयांचं व्याजी कर्ज घेतलं होतं. यातील दोन लाख रुपयांची परतफेड हरिणखेडे यांनी केली होती. मात्र उर्वरित १ लाख रकमेतील ६० हजार रुपये आज देण्याचं ठरलं होतं. ते घेण्यासाठी आज जसबीर भाटीया हरिणखेडे यांच्या घरी गेला.आताच्या आता कर्ज पाहिजे असा तगादा त्याने लावला. रात्री ८ वाजेपरियंत कर्जाचे संपूर्ण पैसे परत करायचे ठरले असतांना मनात सुळ धरून पूर्ण नियोजित कट रचून आलेल्या भाटीयाने गाडीच्या डीक्कीतून २ पेट्रोल भरल्या बाटल्या काढत कोणाला काही समजायच्या आतच आई कल्पना व मुलगा पीयूष हरिणखेडे याच्या अंगावर पेट्रोल टाकत जिवंत पेटवून दिले.या घटनेत मुलगा तीस टक्के तरआई साठ टक्के जळाली.

   



                                       घटना घडतच आरडा ओरड सुरु झाली. घराला लागलेली आग हि शेजाऱ्यानी आटोक्यात आणली व जखमींना मदत केली .या जीव घेण्या हल्ल्यात लागलेल्या आगीत हरिणखेडे यांचे संपूर्ण घरातील सामान जळाले. या घटनेत जखमी झालेल्या कल्पना व पीयूष हरिणखेडे यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जसबीर भाटीया हा अवैधरीत्या सावकारी करतो. पैसे देण्याचं कबूल केल्यानंतरही त्यानं हा जीवघेणा केल्यानं त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी,अशी मागणी हरिणखेडे कुटुंबानं केली आहे.या घटनेमुळे आता शहरातील अनेक अवैध सावकारांचे धाबे दणाणले असल्याचे समजते आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.