मुंबई, दि. 7 मे २०१९ : 'जेएसडब्ल्यू समूह' या भारतातील आघाडीचा उद्योग समूहाने जेएसडब्ल्यू पेंट्स या ब्रँड खाली रंग (पेंट्स) व्यवसायात प्रवेश केला आहे. ग्राहकांशी थेट संपर्क होणाऱ्या विविध व्यवसायात उतरण्याच्या समूहाच्या विचारधारेचाच हा एक भाग आहे. तसेच या प्रवेशाने इतिहासात पहिल्यांदाच भारतीय उद्योग समूह संघटित अशा रंग व्यवसायात उतरला आहे. रंग व्यवसायात दाखल होऊन, ग्राहकांच्या घरासाठी लोखंड, सिमेंट, फर्निचर आणि आता पेंट अशा व्यापक सेवा उपलब्ध करण्याचा जेएसडब्ल्यू समूहाचा उद्धेश आहे.
या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या तुलनेत, जेएसडब्ल्यू पेंट्स हा अत्याधुनिक तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि स्केल याआधारे एक ग्रीनफील्ड उपक्रम आहे. इंडस्ट्रियल कोटिंग्ज तसेच डेकोरेटिव्ह पेंट्स अशा दोन्हीचे उत्पादन आणि विक्री कंपनी करणार आहे. औद्योगिक कोटिंगमध्ये जेएसडब्ल्यू पेंट्सने क्वाईल कोटिंगच्या माध्यमातून कामकाज सुरु केले आहे. तर डेकोरेटिव्ह पेंट्स विभागात कंपनीने, घराच्या आतील आणि बाहेरच्या भिंतींसाठी फक्त पाण्यावर आधारित रंगांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध होईल. तसेच घरासाठी लाकडी आणि धातूचे विविध पृष्ठभाग (various surfaces ) उपल्बध असतील. या उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार, सन २०२२ पर्यंत भारतीय संघटित रंग उद्योग हा १५ % सीएजीआरसहित सुमारे ५०,००० कोटींच्या पुढे जाईल, अशी अपेक्षा आहे. वेगाने वाढणारी ग्राहक गतिशीलता, व्यवसायातील रितेपणाची गरज तसेच जागतिक ट्रेंड्स समजून घेण्यासाठी जेएसडब्ल्यू पेंट्सने अगदी सक्रियपणे बाजाराचा अभ्यास केला आहे. भारतीय रंग क्षेत्रात एक प्रमुख कंपनी होण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.
जेएसडब्ल्यू पेंट्सच्या अनावरणप्रसंगी बोलताना, जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जी जिंदाल यांनी सांगितले कि, "विवेकी असणे हेच सौंदर्य' या तत्वावर जेएसडब्ल्यूमध्ये आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच जेएसडब्ल्यू पेंट्सचा प्रत्येक पैलू हा यापूर्वी कधीही झाली नाही अशाप्रकारे दर्जेदार असल्याची आम्ही खात्री केली आहे. तसेच आमच्या ग्राहकांना खरे मूल्ये देण्याची वचनबद्धता आहे. म्हणूनच भारतात पाहिल्याच एकाच किंमतीत कोणताही रंग उत्पादनामध्ये देण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आम्ही विचारपूर्वक उचलले आहे. नव्या पिढीतील युगुलांसाठी ही एक प्राध्यान्याची निवड असेल अशी अपेक्षा आहे. जेएसडब्ल्यू पेंट्स हेच भारतीय घरांचे भविष्य आणि रंगकाम असावे असे आमचे उद्धिष्ट आहे."
जेएसडब्ल्यू पेंट्सचे सह व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. एस. सुंदरेसन यांनी सांगितले कि, " रंगकामासाठी जेएसडब्ल्यू पेंट्सचा सहज, जलद आणि खात्रीपूर्ण मार्ग हाच माहितीपूर्ण व विश्वासार्ह निवड करण्यासाठी ग्राहकांना मदत करणारा एक प्रदीर्घ मार्ग ठरेल.आमच्या 'एनी कलर वन प्राईस' या योजनेमुळे ग्राहकांना मोठे मूल्य, किमंत पारदर्शीपणाला सुरुवात झाली असून त्यांच्या घरांसाठी आत्मविश्वासाने रंगांची निवड करण्यास ते मुक्त झाले आहेत. भविष्यातील रंग आणि रंगकामाला प्रचंड मूल्य पुरविणारे आणि ट्रेंड सेटिंग करणारे विचारशील नाविन्यता आणण्यासाठी ग्राहकांच्या अपेक्षांनुसार उत्पादन आणि विपणन क्षेत्रातील उत्कृष्टता आम्ही जेएसडब्ल्यू पेंट्समध्ये एकत्र केली आहे."
आपल्या ग्राहकांकरिता सुंदर अनुभव निर्माण करणारी विचारशील पेंट कंपनी बनण्याचे जेएसडब्ल्यू पेंट्सचे उद्धिष्ट आहे. या प्रभावाने, रंग, ग्राहक साहाय्य, पॅकेजिंग आणि उत्पादन अशा सर्वच बाबतीत विचारशील हस्तक्षेपाच्या आधारावर संपूर्ण व्यवसाय आणि ब्रँड विधान आहे.
दक्षिण भारतात कर्नाटक (बंगळुरू व हुबळी) येथे सुरुवात करून जेएसडब्ल्यू पेंट्सने पदार्पण केले आहे. पुढील तीन वर्षात संपूर्ण देशभरात विस्तार करण्याचा योजनेसह, २०२० वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस दक्षिण व पश्चिम भारतात संपूर्णपणे व्यवसाय सुरु करेल अशी अपेक्षा आहे. तसेच भारतीय बाजारातील १० % हिस्सा पटकावून सन २०२५ पर्यंत जेएसडब्ल्यू पेंट्स ही कंपनी देशातील आघाडीच्या पहिल्या तीन ब्रॅण्डपैकी एक असेल असे ध्येय आहे.