आवाळपूर/प्रतिनिधी:
गुरूदेव सेवा मंडळ कोरपना तालुक्याच्या वतीने गेल्या अकरा वर्षांपासून बाखर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत सु-संस्कार शिबिराचे आयोजन करून बाल- गोपालाना सुसंस्कार,मलाखाम, लाठीकाठी,प्रार्थना,सर्व धर्म समभाव, आदर, भारतीय संस्कृचे जतन अश्या विवीध संस्कारी प्रशिक्षण देऊन बाल- गोपालांच्या अंगी सु-संस्कारी कात उन्हाळी शिबिरे टाकत आहे.
उन्हाळा लागला की बाल- गोपालांच्या चेहऱ्यावर एक हस्यस्मित येते कारण ते अभ्यास व शाळा यांच्या असून मुक्त होतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गुरुदेव सेवा मंडळा मार्फत गेल्या अकरा वर्षांपासून बाल सु-संस्कार शिबिराचे आयोज केले जात असून याला बाल- गोपालांच्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे.
गुरुदेव सेवा मंडळ बाखर्डी करीत आहे नियोजण
राष्ट्रसंताच्या मार्गवर त्यांच्या विचारांवर प्रेरित गुरुदेव सेवा मंडळ बखर्डी व कोरपना तालुक्यातील राष्ट्रसंत विचार प्रचारक मंडळींनी गेल्या अकरा वर्षांपासून अविरतपणे मेहतीने शिबिराचे आयोजन करून एक आदर्श निर्माण केला आहे . आदर्श विचार पेरण्याच्या कालखंडात विद्यार्थ्यांना संस्कार शिबिरात प्रशिक्षण देऊन राष्ट्रसंताच्या विचार व आचार रुजवून संस्कारी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम उन्हाळी शिबिरे करीत आहे.
47 डिग्री तापमानात घेत आहे बालगोपाल धडे
चंद्रपूर जिल्यातील 47 डिग्री तापमनात असताना शिबिरात वेगवेळ्या खेळाचे प्रशिक्षण मिळत असल्याने बाल गोपाल सहभाग घेत असून शिबिरात आनंद लुटतांना दिसून येत आहे.
दिवसेंदिवस वाढत आहव बाल गोपालांची संख्या
सुरवात अगदी कमी संख्ये पासून झाली असताना सुद्धा दिवसेंदिवस बाल गोपालांची संख्या वाढताना दिसून येत आहे. यावर्षी चंद्रपूर जिल्हातील 15 ही तालुक्यातील तब्बल 150 बाल गोपालांनी हजेरी लावली असून ते सुसंस्काराचे धडे घेत आहे.हभप. किन्नके महाराज, हभप.सुरेश चौधरी महाराज, ताविडे महाराज, गोहोकार महाराज, आकाश ताविडे, अमर ताविडे, प्रकाश उपरे, व इतर राष्ट्रसंत प्रचारक मंडळी व गुरुदेव सेवा मंडळ बखर्डी चे पदाधिकारी महिन्याचे शिबिर यशस्वी होण्याकरिता अपार परिश्रम घेत आहे