नागपूर जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायतींना भेटी
मध्यप्रदेश पंचायत राज संचालनालय चमूचा अभ्यास दौरा
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग मध्यप्रदेश सरकारच्या चमूने नागपूर ( ग्रामीण ) तालुक्यातील खापरी ग्रामपंचायत व कळमेश्र्वर तालुक्यातील उबाडी ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना भेट देऊन अभ्यास केला .
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांनी या समूहाचे स्वागत केले त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या कक्षात चर्चा करून सर्व टीम जिल्हा परिषद स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात दाखल होताच त्यांचे स्वागत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नागपूर तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या संपूर्ण समूह यांनी स्वागत केले तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या सर्व आज्ञावलीची माहिती शिल्पा गाणेगाकार ,आज्ञावलीचे मुख्य प्रशिक्षक स्वामी सर यांनी आपले सरकार सेवा केंद्राच्या विविध कामाची माहिती दिली
अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या पंचायतराज संचालनालयाच्या संचालक या उर्मिला शुक्ला व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अवि प्रसाद, पंचायत अधिकारी एस के निमा, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पांडे , राजकुमार तिवारी श्रीवास्तव पंचायत समन्वयक अधिकारी हरिशंकर शुक्ला ,आनंद गुप्ता व इतर जिल्हा परिषद अधिकारी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील सन २०१६ मध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आले असून शासनाला आवश्यक असणारी माहिती नागरिकांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले ऑनलाईन द्वारे उपलब्ध करून या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यात अंमलबजावणी करीत असलेल्या आपले सरकार सेवक सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर जीटूसी मध्ये अकरा आज्ञावली डाटा एन्ट्रीचे काम पूर्ण करणे ,प्लॅन प्लस, प्रियासोफ्ट एरिया प्रोफाइल मीटिंग मॅनेजमेंट सोशियल रहिवासी दाखला ,उत्पन्नाचा दाखला , कॅरेक्टर सर्टिफिकेट, जन्ममृत्यू व एक ते एकोणवीस प्रकारचे दाखले ग्रामस्थांना वितरित करण्यात आल्याचे सांगितले
ग्राम अंतरावरील आपले सेवा सरकार केंद्राचा अभ्यास व नागरिकांशी संवाद नागपूर ग्रामीण तालुक्यातील खापरी येथे व कळमेश्वर येथील उबाडी ग्रामपंचायत येथील नागरिकांशी संवाद साधला
यावेळी पंचायत विस्तार अधिकारी अनिल इंगळे , प्रकल्प व्यवस्थापक विनय पहलानी मास्टर ट्रेनर आकाश बोरीकर, जिल्हा व्यवस्थापक किशोर पठाडे ,तालुका व्यवस्थापक महेश ढोक , केंद्र संचालक तसेच ग्रामपंचायत अधिकारी गावातील सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,असंख्य नागरिक उपस्थित होते .