किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांचा दणका
चंद्रपूर - शहराला पाणी पुरवठा करणारी इराई नदी मध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध असून सुद्धा शहराला पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे, याचं प्रमुख कारण म्हणजे पालिकेचे ढिसाळ नियोजन व पाणी पुरवठा कंत्राटदारांची मुजोरी आहे. आधी शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा व्हायचा, आता 4 दिवसाच्या नंतर शहरातील काही भागात पाणी पुरवठा व्हायला लागला, पाण्याच्या प्रश्नावर एकही जनप्रतिनिधी गंभीरपणे बोलायला व समस्येचं निराकरण करायला तयार नाही. शहरातील पाण्याच्या प्रश्नावर फक्त यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार खंबीरपणे आवाज उचलत आहे, त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने सुद्धा केली. आजही शहरातील बालाजी वॉर्ड, बाबूपेठ या परिसरात 1 आठवड्यानंतर पाणी पुरवठा होतो, पालिका व पाणी पुरवठा कंत्राटदार नागरिकांचा अंत बघत आहे.
शहरातील फुकटनगर परिसरात मागील 4 दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे, पाईपलाईन फुटली असल्या कारणाने परिसरातील पाणी पुरवठा बंद आहे, नागरिकांनी त्या भागातील नगरसेवक व कंत्राटदाराला याबाबत तक्रार सुद्धा केली पण त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, अखेर परिसरातील नागरिकांनी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्याशी संपर्क साधला असता जोरगेवार यांनी 14 एप्रिलला त्या भागाची पाहणी केली व 24 तासाच्या आत आपली समस्या दूर करू असे आश्वासन दिले. आज 15एप्रिलला यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी फुकटनगर गाठले, पाणी पुरवठा कंत्राटदाराने यंग चांदा ब्रिगेडचा धसका घेत तात्काळ पाईपलाईन दुरुस्त केली. किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली यंग चांदा ब्रिगेडच्या संतोषी चव्हाण यांच्या नेतृत्वात इरफान शेख,रुपेश पांडे, वंदना हातगावकर, विनोद तोडराम, जमिला मेश्राम यांनी नागरिकांना लवकरात लवकर परिसरात नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू अशी शास्वती दिली. परिसरातील नागरिकांनी किशोर जोरगेवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.शहरातील पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस वाढत आहे प्रशासनाने यावर लवकर उपाययोजना करून नागरिकांना मूलभूत गरजेपासून वंचित करण्याचा प्रकार बंद करावा अन्यथा याचे गंभीर परिणाम पालिका प्रशासन व उज्वल कन्स्ट्रक्शन ला भोगावे लागतील असा इशारा यावेळी जोरगेवार यांनी दिला.