नागपूर : ट्रान्सपोर्टर भूपेंद्रसिंग उर्फ बाँबी मंजितसिंग बाँबी माकन वय 46 रा.दीक्षितनगर यांची हत्या करून ,प्रेत नागपूर जिल्हा ग्रामीण मधील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काथलाबोडी शिवारातील बडबड्या नदीच्या पुलाखाली रविवारी सकाळी आढळून आले आहे.
भूपेंद्रसिंग उर्फ बाँबी सरदार तीन दिवसापासून बेपत्ता होते.26 एप्रिल रोजी रात्री जरीपटका पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल करण्यात आली . तेव्हा पासून बेपत्ता होते. त्यांची गाडी मात्र त्याच दिवशी जरीपटका येथील साईमंदिराजवळ आढळून आली होती .
आज रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास काथलाबोडी येथील बडबड्या नदीच्या पुलाखाली ते म्रुतावस्थेत आढळून आले.काथलाबोडी येथे पुलाखाली एक प्रेत पडून असल्याची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटना स्थळाला भेट देऊन ,याची माहिती ग्रामीण व नागपूर शहर पोलिसांना देण्यात आली.बाँबी सरदार तीन दिवसापासून बेपत्ता असल्याने जरीपटका पोलीस त्यांच्या नातेवाईकांना घेऊन घटनास्थळी गेले असता, नातेवाईकांनी त्यांंचे प्रेत ओळखले.
बाँबी सरदार धष्टपुष्ट असल्याने नागपूर येथून अपहरण करून , घटनास्थळी मारणे अवघड असल्याचे बोलले जाते.नागपूर येथेच गाडीत किंवा अन्य ठिकाणी गळा आवळून खून केला असावा व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेत पुलाखाली फेकले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.