- आंदोलनकर्त्यांनी खासदार नेतेंचा केला निषेध
- सुभाष धोटे व अरुण धोटे यांना अटक करेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार
राजुरा/प्रतिनिधी
येथे नामांकीत काॅन्वेंट स्कुल मध्ये मुलींवर लैंगिक अत्याचाराचे विरोधात मागील चार दिवसापासुन सुरू असुन पंधरा दिवसाचे वर होवुन एकही नेता बोलायला तयार नाही. भाजपचे खासदार अशोक नेते राजुरा येथिल बेमुदत धरणे आंदोलनाला भेट दिली. मात्र नेते हे पंधरा दिवस लोटल्या नंतर आंदोलनस्थळी भेटायला आल्याने अशोक नेते यांचा निषेध करुन संताप व्यक्त केला.
यावेळी राजुरा येथिल बेमुदत धरणे आंदोलनाला खासदार अशोक नेतेंनी भेट दिली. मात्र आंदोलनकर्ते खासदारांचा निषेध करुन संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी नेते यांना संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना राजुरा नगराध्यक्षपदावरुन निलंबित करण्याची मागणी लावुन धरली. यावेळी अशोक नेते यांनी संस्थेचे संस्थाचालक सुभाष धोटे व अरुन धोटे यांना अटक करण्याची ग्वाही दिली.
यावेळी अशोक नेते यांना निवेदनही देण्यात आले. निवेदनातुन याप्रकणातील दोषी सुटु नये यासाठी नामांकित वकीलाची नेमणुक करावी, आरोपींची नार्को टेस्ट करावी, आश्रम शाळा बंद कराव्या. यासह इत्यादी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात मधुकर कोटनाके, तुळशिराम किन्नाके, लोमेश मडावी, बापुराव मडावी, पोर्मिमा घडले, कविता मडावी, बंडु मडावी, धिरज मेश्राम, योगेश कोडापे , संतोष कुळमेथे, यासह इत्यादी सहभागी होते. नेते यांना संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना राजुरा नगराध्यक्षपदावरुन निलंबित करण्याची मागणी लावुन धरली.