Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल २८, २०१९

संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा

महिला दलित सेनेची मागणी 

चंद्रपूर/ प्रतिनिधी 
राजुरा येथील आदिवासी वसतीगृहामध्ये आदिवासी विद्यार्थीनींवर झालेल्या अत्याचारासंदर्भात बेताल वक्तव्य करणारे संस्थाध्यक्ष सुभाष थोटे व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला दलित सेनेने केली आहे. 

राजुरा येथील आदिवासी वसतीगृहात आदिवासी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आलेला आहे . सदर प्रकरणाने चंद्रपूर जिल्हा ढवळून निघाला असतांना संस्थेचे अध्यक्ष व इतरांनी आदिवासी समाजाची अपमान करणारे बेताल वक्तव्य चंद्रपूर येथील आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली . पॉक्सोअंतर्गत मिळणाच्या मदतीच्या लालसेपोटी आदिवासी मुलींचे पालक आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी पुढे सरसावत असे अतिशय निर्लज्ज , निंदनीय आणि लांच्छनास्पद वक्तव्य , ज्यांच्या शाळेत आदिवासी मुलींवर अत्याचार झाले , त्या शाळेचे अध्यक्ष तथा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा . केंद्र शासन व राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे आदिवासी समाजाच्या विद्याथ्र्यांना पहिली ते बारावी पर्यंत सिबिएसई व उच्च शिक्षण मिळावे यासाठी योजना राबविण्यात येत आहेत . या योजनेअंतर्गत आदिवासी विद्याथ्र्यांना सिबीएसई चे शिक्षण देण्याचे कार्य राजुरा येथील आदिवासी निवासी शाळेमध्ये केल्या जात होते . आदिवासी समाजाच्या विद्याथ्र्यांना उच्च शिक्षण मिळावे व आदिवासी समाजाचा विकास व्हावा या हेतुने पालकांनी आपल्या मुला - मुलींना राजुरा येथील आदिवासी वसतीगृहात शिक्षणासाठी प्रवेश घेण्यात आला होता . सदर योजना शासनाच्या धोरणानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सन २०१० पासून सुरू आहे . त्याच आदिवासी वसतीगृहामध्ये १० च्या वर अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनींवर लैगिंक अत्याचार करण्यात आलेला असून वसतीगृह व शिक्षण संस्था चालकाची व संचालकांची भूमिका या प्रकरणांमध्ये संशयास्पद आहे . वसतीगृहामधील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आल्यानंतर ही अध्यक्ष व संचालकांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही . या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही राजुरा येथील आदिवासी वसतीगृहाचे अध्यक्ष व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा  दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.