Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २३, २०१९

महाराष्ट्र दिनापासून इको-प्रोची वारसा संवर्धन परिक्रमा

संपुर्ण महाराष्ट्रात पोहचणार गडकिल्ले आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश

‘आपला वारसा, आपणच जपूया’ या थिमअंतर्गत ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जतन आणि संवर्धनासाठी परिक्रमा

चंद्रपूर/प्रतिनिधी
चंद्रपूर शहरातिल ऐतिहासिक गोंडकालिन किल्ल्याची सलग सातशे दिवस स्वच्छता केल्यानंतर चंद्रपूरात इको-प्रोच्या स्थानिक युवकांनी ‘आपला वारसा, आपणच जपूया’ असा नारा देत किल्ला स्वच्छता अभियान राबविले. यात चंद्रपूरकर नागरिकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आणि सहकार्य मिळाले. स्थानिक नागरिकांमध्ये आपल्या वारसाबद्दल असलेली आस्था आणि दिलेल्या प्रोत्साहनाची प्रेरणा घेत संपूर्ण राज्यात ऐतिहासिक वारसा आणि वन्यजीवासह निसर्गाच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन संदेश परिक्रमा या नावाने हा उपक्रम येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासुन सुरू होत असल्याची माहीती इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सांगीतले की, चंद्रपूरला ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा, स्मारकांचा समृध्द वारसा आहे. याशिवाय ताडोबाच्या निमित्ताने वन्यजीव आणि निसर्गाची समृध्दीही चंद्रपूरला लाभलेली आहे. जिल्ह्यात इको-प्रो दोन्ही आघाड्यांवर सक्रिय असून हा वारसा चंद्रपूरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात जपला जावा आणि संपुर्ण राज्याचेच ऐतिहासिक तसेच नैसर्गिक वारसा संवर्धन व्हावे, या हेतुने सदर परिक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज हा दोन्ही प्रकारचा वारसा अनेक अडचणी - समस्यांचा सामना करित आहेत.
आज बरेच ठिकाणी ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असून, त्याचे जतन आणि संवर्धन गरजेचे आहे तर नैसर्गीक वारसा असलेले अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पे, वन-वन्यजीव यांचा अधिवास अनेक कारणामुळे प्रभावीत होत आहेत. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे वन्यप्राणी संवर्धनाची चळवळ संकटात आलेली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यासाठी सर्व पातळीवर जागृती गरजेची आहे. या दोन्ही प्रकारच्या वारसा संवर्धन जनजागृतीच्या दृष्टीने ही परिक्रमा उज्ज्वल भविष्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

चंद्रपूर मध्ये वन-वन्यजिव तसेच ऐतिहासिक स्मारकांचा वारसा जपत असतांना स्वःप्रेरणेने लोकांनाच संवर्धनाकरिता यशस्वीपणे तयार करण्यात आले. आपला वारसा आपल्यालाच जपायचा आहे, ही भावना जशी लोकांमध्ये बिंबविण्यात यश मिळाले आणि ऐतिहासिक बदल होतो आहे तसाच बदल राज्यभरातील लोकांमधुनच स्वंयस्फुर्तीने व्हावा हा महत्वाचा संदेश या परिक्रमेतुन देण्यात येत असल्याची माहीती धोतरे यांनी दिली.

या परिक्रमेत इको-प्रो संस्थेचे 25 युवक आपल्या दुचाकीसह स्वंयप्रेरणेने भाग घेत असून सुमारे 5000 किमीचे राज्यभ्रमण इको-प्रो चे हे परिक्रमादुत करणार आहेत. चंद्रपूरातुन सुरू होणा-या या परिक्रमेचा समारोप सेवाग्राम नंतर पुन्हा चंदपूरातच होणार आहे. या परिक्रमेदरम्यान राज्यातील या विषयाशी आस्था बाळगणा-या मान्यवर व्यक्तीच्या भेटी घेऊन त्यांचेही सहकार्य भविष्यासांठी घेण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हयात जाऊन संबधित जिल्हयातील ऐतिहासिक वारसा व वन-वन्यजीव नैसर्गीक वारसा संदर्भातिल समस्यांचा आढावा घेत त्याच्या निवारणासाठी उचित आराखडा बनविण्यासंबधांने जिल्हास्तरावर स्थानिक तसेच विशेषज्ञ यांचा बैठकाही घेण्यात येतील. या माध्यमातुन राज्यभर विणलेल्या जाळ्याचा उपयोग चंद्रपूरसह संपुर्ण राज्यातील या क्षेत्राच्या समस्या निवारण्यासाठी करण्यात येणार असल्याचा विश्वास धोतरे यांनी व्यक्त केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.