Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २३, २०१९

हेल्दी कुकआउट मध्ये दैनंदिन जीवनातील बदामाचे महत्व



नागपूर २३ एप्रिल २०१९ : बदामाला “किंग ऑफ नट्स” च्या स्वरूपात ओळखल्या जाते तसेच अनेक गुणांनी परिपूर्ण बदाम आपल्या दैनंदिन जीवनातील एक स्वादिष्ट भाग आहे, जो नैसर्गिक चांगुलपणा प्रदान करतो, कुरकुरीत, शानदार आणि पौष्टिक नैसर्गिक माध्यमातून बदामाला विविध पद्धतीने आपल्या दैनंदिन आहाराचा भाग बनवू शकता. नागपूर येथे आयोजित एका वेगळ्या कुकआउट सेशनद्वारे या विचाराला पुढे नेण्यासाठी मदत करण्यात आले आहे, जिथे शहरातील गृहिणी द्वारे बदामांपासून वेगळ्या स्नॅक्स आणि फेस्टिव रेसिपी बनविण्यात आल्या, तर या सेशनचे संचालन शेफ विष्णू मनोहर आणि पोषण विशेषज्ञ मेघना कुमारे यांनी केले, यावेळी शहरातील तीन गृहिणींनी कशा प्रकारे स्नॅक्स आणि फेस्टिव रेसिपीच्या माध्यमातून बदामाला आपल्या दैनंदिन आहाराचा भाग बनवू शकतो हे दर्शविले आहे.

या इंटरॅक्टिव्ह सेशनची सुरुवात तीन गृहिणींनी आहार बनविण्याचे कौशल प्रदर्शित करण्यासोबत केली तर ज्यामध्ये त्यांनी एक-एक रेसिपी प्रदर्शित करून स्नॅकिंग आणि फेस्टिव रेसिपीमध्ये बदामाचा मुख्य इंग्रीडिएंटच्या स्वरूपात उपयोग करण्यात आला आहे. गृहिणीने आपले पदार्थ तयार केले तर पोषण विशेषज्ञ मेघना कुमारे आणि शेफ विष्णू मनोहर म्हणाले की ,बदाम हे हेल्दी नाश्तासाठी आवश्यक आहे .त्याबरोबरच पोषण विशेषज्ञ मेघना कुमारे यांनी सांगितले की, "बदाम हे व्हिटॅमिन इ, मैग्रीशियम, आहार फायबर, प्रोटीन इत्यादी सारख्या १५ पोषक तत्वाचे एक पॉवर हाउस आहे"

यावेळी पोषण विशेषज्ञ मेघना कुमारे यांनी सांगितले की, "भारतीय परिवारांकरिता, भोजन हे सर्वप्रथम आहे आणि साधारणता आपण दुपारच्या किंवा संध्याकाळच्या सुरुवातीला स्नॅक्स ची योजना बनवत नाही , तर बदाम सोबत स्मार्ट स्नॅकिंग करून एक निरोगी जीवन शैली बनवू शकतो. बदामाचा निरोगी आहारात समावेश करून टोटल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होतांना दिसत आहे आणि हे हृदयाला नुकसान पोहचविण्याऱ्या इन्फ्लेमेशनच्या स्तराला कमी करण्यात मदत करू शकतात, इतकेच नाही तर मुठ्ठीभर बदाम हे परिपूर्णच्या भावनेला वाढवतात ज्यांनी तुम्हाला भूक लागत नाही, बदामाच्या स्वाभाविक स्वरूपातील आहारात उच्च फायबर आणि शुगर कमी असते.

शेफ विष्णु मनोहर यांनी सांगितले की, "आम्ही नेहमी आरोग्याबद्दल जागरूक असल्यामुळे आम्ही नेहमीच अश्या प्रकारचे पदार्थ शोधत असतो जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. बदामासारखे नट्स हे निरोगी पर्याय आहे, ज्यांचा पारंपरिक स्वरूपात विविध स्नॅक्स बनविण्यासाठी उपयोग करू शकता ज्याला तुम्ही सणांच्या दरम्यान सर्व्ह देखील करू शकता. तसेच सहजतेने बदामचा स्वाद देवून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले वापरू शकता,साध्या बदामाव्यतिरिक्त, आपल्या परिवाराला एक निरोगी आणि स्वादिष्ट स्नॅक्सच्या स्वरूपात बदामाचे सेवन करू शकता.

कुकआउट सेशननंतर सर्वात चांगले स्नॅकिंग आणि फेस्टिव्ह रेसिपी बनविण्याऱ्या गृहिणींना आकर्षक गिफ्ट देऊन सम्मानित करण्यात आले.

बदामाचे सेवन करणे हे निरोगी राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. एका निरोगी जीवनशैली साठी व्यायाम करणे व निरोगी संतुलित आहार घेणे आवश्यक तर आहेच, त्याबरोबरच स्मार्ट स्नॅकिंग देखील आवश्यक आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.