चंद्रपूर २५ एप्रिल - चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेत समग्र शिक्षा अंतर्गत नावीन्य पूर्ण विज्ञान केंद्राची सुरवात करण्यात आली असून महानगरपालिका आयुक्तसंजय काकडे यांनी बुधवार २४ एप्रिल रोजी सदर केंद्राला भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अश्या गणित व विज्ञानाच्या विविध मॉड्युल्सची माहिती जाणून घेतली.
शासनाने 2018 -19 या शैक्षणिक सत्रापासून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण या योजनांचे एकत्रीकरण करून ‘समग्र शिक्षा’ अभियानयोजनेची निर्मिती केली आहे. हे अभियान पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलांसाठी सुरू करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनाची संधी उपलब्ध करूनदेण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या विज्ञान केंद्रामध्ये ५२० प्रकारचे गणित व विज्ञानाचे मॉड्युल्स ( भाग ) असून याची किंमत १४ लाख रुपये आहे.
या केंद्राची पाहणी करण्यादरम्यान मार्गदर्शन करतांना आयुक्त म्हणाले की, अत्याधुनिक नावीन्य पूर्ण विज्ञान केंद्राद्वारे शालेय विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान संशोधनाचे धडे मिळण्यासमदत होत आहे.त्याचबरोबर विद्यार्थ्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हे केंद्र महत्वाचे ठरणार आहे. मुलामुलींमधील जिज्ञासूवृत्ती वाढावी, त्यांच्यातील कृतिशीलता वनिरीक्षण क्षमता वाढावी, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानजागृती व्हावी यासाठी सदर विज्ञान केंद्र उपयुक्त आहे. गणित व विज्ञानाच्या काही संकल्पना ज्या सुरवातीला समजणे विद्यार्थ्यांनाअवघड जातात त्या खेळाद्वारे शिकविल्या जात असल्याने समजण्यास सोप्या जातात. शाळेच्या मुख्याध्यापकांनी केंद्रासंबंधी नियोजन करून विद्यार्थ्यांना माहिती देण्याच्या सूचनाही त्यांनीदिल्या. शाळेच्या वतीने नेताजी चौक येथे पाणपोई सुरु करण्यात आली असून या दोन्ही उपक्रमांची आयुक्तांनी प्रशंसा केली.
मागील काही वर्षात आयुक्त संजय काकडे यांच्या प्रयत्नांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक कालानुरूप काही वैशिष्ट्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. शिक्षकांद्वारेगुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्य दिले जात आहे. अत्याधुनिक सोयी सुविधा विद्यार्थ्यांना देण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मुले आत्मविश्वासपूर्वक बोलत आहेत, यापैकी काहीशाळांमध्ये प्रभावी स्पोकन इंग्रजीचा वापर करण्यात येत आहे, आता शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नावीन्य पूर्ण विज्ञान केंद्र सुरु करण्यात आलेआहे. या विविध उपक्रमांद्वारे वाढलेल्या गुणवत्तेमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून पाल्यांना मनपा शाळांमध्ये दाखल करण्याकडेही पालकांचा वाढता कल आहे. या बदलत्या कलाची (reversal ट्रेन्डची ) दखल घेणे क्रमप्राप्त आहे.
विज्ञान केंद्राची पाहणी करण्यादरम्यान उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत यांनीविज्ञान केंद्राची माहिती उपस्थितांना दिली.