नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणात रामनगर पोलीस ठाण्यात सुभाष धोटे व इतर अशा आशयाने अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पॉकसो कायद्याअंतर्गत राज्य सरकारकडून 3 लाख किव्हा 5 लाख रुपयांची मदत मिळते. त्यामुळे अनेक तरुणी आणि त्यांचे पालक पैशासाठी गुन्हा नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत, हासुद्धा पब्लिसिटीचा धंदा झाला आहे, असं वक्तव्य जिल्हाध्यक्ष सुभाष धोटें यांनी केले. हे वक्तव्य करताच काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे व इतर आजी माजी आमदार अडचणीत सापडले.
सुभाष धोटे यांनी पत्रपरिषदेत केलेल्या वक्तव्याचा आदिवासी समाजाकडून निषेध होणे सुरू झाले यानंतर विरोधक चांगलाच समाचार घेऊ लागले.या विधानानंतर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली. बुधवारी रामनगर पोलीस ठाण्यात सुभाष धोटे व इतर अशा आशयाची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र हे इतर तीन कोण हे अजूनही समजू शकले नाही,
राजुरा येथील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणी पीडित पालक आणि आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शहराला भेट दिली. यावेळी न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला जलद गती कोर्टात चालवनार यासाठी विशेष कोर्टासाठी विनंती करणार असल्याचे ते बोलले, याच सोबत अशा विद्यार्थ्यांचे समायोजनासाठी विशेष जीआर काढणार असून दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करणार, विद्यार्थी समायोजन प्रक्रिया संपूर्ण खर्च शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काळात महिला वसतिगृहात फक्त महिलाच अधीक्षक असाव्यात,महिलांच्या वसतिगृहात अचानक भेट देण्यासाठी महिला अधिकारी,महिला लोकप्रतिनिधी,महिला पत्रकार
महिला पोलीस अधिकारी या पैकी कोणीही व्यक्ती महिलांच्या वस्तीगृहाचा कारभार बघण्यासाठी त्या ठिकाणी जाण्याची मुभा असण्यासंदर्भातला विचार करण्यात येणार असल्याचे यावेळी मुनगंटीवार म्हणाले.