जोरगेवार यांच्या नेतृत्वात महापालीकेसमोर भिक मांगो आंदोलन
यंग चांदा ब्रिगेडची मनपा उपायुक्तांना पैसे घ्या,पण पाणी द्या ची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूरात सुर्याचा पारा ४५ अंशावर गेला असतांनाच महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामूळे उन्हाचे चटके सोसत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावें लागत आहे.
अश्यातच आता नागरिकांचा रोष अनावर होत असून संतप्त झालेल्या विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांनी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात महापालीकेसमोर भिक मांगो आंदोलन करून जमा झालेले पैसे मनपा उपायुक्तांना देत पैसे घ्या पण पाणी द्या अशी मागणी केली. यावेळी स्थानीक नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या सह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंद्रपूरचे स्वप्न दाखवीणा-या चंद्रपूर महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामूळे नागरिकांना प्रचंड त्रास सहण करावा लागत आहे. सध्या चंद्रपूरात पाण्यासाठी पाणीपत सूरु आहे. शहरातील अनेक प्रभागात मागील 10 दिवसांपासून पाणीपूरवठा ठप्प आहे. त्यामूळे चंद्रपूरातील तापत्या उन्हात नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे.
इरई धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठी उपलब्ध असूनही शहरात पाणी पूरवठा नियमीत रित्या केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये मनपा प्रशासना विरोधात रोष आहे. त्यातच आता भाजपच्या एका नगर सेवकाने उज्वल कन्ट्रक्शचे 60 लाख रुपये थकीत असल्याने पाणी पूरवठा बंद असल्याचे सांगत नागरिकांच्या रोषात आणखी भर घातला आहे.
नियमीत पाणी कर अदा करुनही नारिकांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येणे हे दुर्दैव असून हा चंद्रपूरकरांवर अन्याय आहे. मात्र आता हा अन्याय सहण केल्या जाणार नाही असा ईशारा यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी दिला असून आज स्थानीक विठ्ठल मंदिर वार्डातील नागरिकांसह जोरगेवार यांनी चंद्रपूर महागनर पालिका गाठत पालिकेसमोर भिक मांगो आंदोलन केले. यावेळी जमा झालेले पैसे उपायुक्त गजानन बोकडे यांना देवून महापालिकेकडे पैसे नसेल तर पैसे घ्या पण आम्हाला पाणी द्या अशी मागणी केली.
यावेळी किशोर जोरगेवार व नगर सेवक विशाल निंबाळकर यांनी मनपा आयूक्त संजय काकडे यांच्या दुरध्वनी वरुन सविस्तर चर्चा करुन उपायुक्त गजानन बोकडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. सहा दिवसात शहरातील पाणी प्रश्न सुटेल असे आश्वासन यावेळी मनपा उपायुक्तांनी दिले.
आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन करु असा ईशारा यावेळी यंग चांदा ब्रिगेटच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जितेंद्र चोरडीया, अतुल रेशिमवाले, दिलीप पाठक, भारत बडवे, राहुल पाल, राजु ठाकरे, ज्योती जुमडे, करूणा जुमडे, शिल्पा बडवे, ज्योती पाठक, विशाल पाठक, किशोर जोशी, संतोष जोशी, संजू जोशी, मनोहर पाठक, ताराबाई जोशी, सागर पावडे, राजू कोहळे, गजानन कोहळे, गौरी ठाकरे, शिला पाल, वर्षा कावडकर, प्राजक्ता हस्तक, सुरेश राजूरकर, सविता श्रीमंतवार, मधू खतरी, माधूरी पाठक, भारती शिंगरु, सुशिला बावणे, विद्या मोरील, राजेश ठाकरे, रुंगदेव मांडवकर, प्रविण ठाकरे, नंदा पाठक, कमलाबाई चोरडीया, प्रदमा चापले, अश्वीनी सोनटक्के, मंजूशी पावडे, कांताबाई दंडेले, वनिता टिपले, प्रीया बावणे, शालू चंदेलवार, अंजू दंडेले, यशोदाबाई कजलीवाले, कमलाबाई सोनटक्के, यांच्यासह विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.