चंद्रपूर/प्रतीनिधी:
महावितरण चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर मंडल तसेच चंद्रपूरविभाग/उपविभाग कार्यालयांनी सामाजिक बांधिलकी जपत महाकाली यात्रेकरीता येणाऱ्या भाविकांना थंड पाणी व भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर व चंद्रपूर मंडलाचे अधिक्षक अभियंता अशोक म्हस्के तसेच कार्यकारी अभियंता श्री. अविनाष कुरेकार यांच्या मार्गदर्शनानुसार चंद्रपूर उपविभाग क्रमांक १ मधिल कर्मचारी यांनी भाविकांना भोजनदान केले.
18 एप्रिलला महावितरणच्या चंद्रपूर मंडल कार्यालय, विभागिय कार्यालय व उपविभाग क्रमांक १ कार्यालय तसेच व कंत्राटदार रवी कातकार यांनी भाविकांना मसाले भात व शरबत जसेच जल उपलब्ध करून दिले. मानवतेच्या व सहकार्याच्या भावनेने दिवसभर पुरेल असे थंड पाणी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आले.महाकाली यात्रेकरिता मोठया प्रमाणात नांदेड, बीड, यवतमाळ, चंद्रपूर,गडचिरोली, वर्धा, गोंदिया तसेच विदर्भातील इतर जिल्हयातील तसेच आंद्र्प्रदेश व तेलंगाणा राज्यातील भावीकांनी मोठया प्रमाणात लाभघेतला.
चंद्रपूर उपविभाग-१ चे अतिरीक्त कार्यकारी अभियंता श्री. वसंत हेडाऊ, बाबुपेठ षाखा कार्यालयाचे षाखा अभियंता व अमोलपिंपळे,सुमेध खनके, टिकेश राउत, विनायक चव्हाण, सहकारी महेंद्र चहारे व उस्मानअली , सुशील देवनांथ, आर. के. टेकाम इत्यादींनी विशेष परीश्रम घेतले.