भ्रष्टाचारी ठेकेदार व सबंधीत अधिकारी यांचेवर कारवाईकची मागणी
मोठ्या थाटामाटात गाजावाजा करुन बल्लारपूर येथे शासनाचे 11 करोड रुपये खर्च करुन नविन माँडेलचे बसस्थानकाचे उद्घाटन 7 मार्च ला पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. अतिशय सुशोभीत व संपूर्ण सोयीसुविधायुक्त अशी या बसस्थानकाने महाराष्ट्रात ख्याती मिळविली होती. परंतु उद्घाटनाच्या काही दिवसातच सिलींग फँन तुटन पडला होता व नुकताच वरुन सिलींग पडली व यामुळे प्रवासी व एस टी कर्मचार्याचा थोडक्यात जिव वाचला.
करोडो रुपये खर्च करुन बसस्थानक बांधण्यात आले परंतु अशा प्रकारामुळे ठेकेदार व येथिल सत्तेवर असनारे लोकप्रतीनीधी यांनी कुठे पाणी मुरवले ? असा प्रश्न येणे स्वाभावीक आहे असे मत राजु झोडे यांनी सांगितले.
वरवर देखावा करुन शासनाच्या पैशाला चुना लावण्याचे काम येथिल ठेकेदार ,अधिकारी व सत्तेवर असणारे लोकप्रतीनीधी करत आहेत हे बल्लारपूर बसस्थानकाच्या बांधकामावरुन स्पष्ट दिसुन येत आहे. तरी संबधीत ठेकेदार व अधिकारी यांची या बांधकामाविषयी सखोल चौकशी करावी व भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिआरएसपी चे नेते राजु झोडे यांनी केली आहे.