पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती
चंद्रपूर/प्रतिनिधी:
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडताच चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उजेडात आला.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील एका नामांकित खासगी शाळेतील वसतिगृहातील १ नव्हे २ नव्हे तर तब्बल ७ विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली.तपास सुरु असतानाच पोलिसांवर चौकशीत ढील देण्याचे आरोप लागू लागले,अश्यातच पोलिसांनी इन्फन्ट जिजस प्रकरणातील ५ संबंधित आरोपींना अटक केली आहे.
दररोज विविध वृत्तपत्रातून इन्फन्ट जिजस प्रकरणात वेगवेगळी माहिती प्रसिद्ध होऊ लागली होती,तसेच पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्न चिन्ह लागू लागले होते,अश्यातच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी चार सदस्यीय समिती स्थापन करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देताच पोलीस विभागाने माध्यमांसमोर आपली बाजू मांडत वसतिगृहातील ७ विद्यार्थिनींवर अत्याचार झाला असून यात ५ आरोपींना अटक करण्यात आल्याचे अधिकृत माहिती शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्र परिषदेत दिली.
हे प्रकरण निवडणुका संपताच १२ एप्रिलला हा संपूर्ण प्रकार समोर आले होते.
शाळेतील वसतिगृहातील विद्यार्थिनींपैकी दोन विद्यार्थिनी आजारी असल्याने त्यांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.या डॉक्टरांनी ह्या प्रकरणाला काळजीपूर्वक हाताळल्या नंतर या केसमध्ये मोठा स्पोट झाला.अन १ नव्हे २ नव्हे तर तब्बल ७ विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली.निवडणुका संपताच हे प्रकरण लोकांपुढे आले .या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले,तत्काळ समितीचे गठन करण्यात आले,त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती.आता या प्रकरणी शाळेतील चौकीदाराला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आता महिला पोलीस उपनिरीक्षक यांचे दोन स्वतंत्र पथक तयार करण्यात
आले आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या नेतृत्वात एकूण
१४ सदस्यांचे पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
२२ एप्रिलपर्यंत उत्तर द्या
इन्फन्ट जिजस राज्याचे आदिवासी आयुक्त व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर पोलीस अधीक्षक, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, राज्याचे मुख्य सचिव, चंद्रपूर जिल्हाधिकारी, राजुरा पोलीस निरीक्षक,यांना नोटीस बजावून २२ एप्रिलपर्यंत उत्तर द्या असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.