Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २०, २०१९

पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या सीएसआर उपक्रमांना 10 वर्षे पूर्ण



वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन
पुणे,19 एप्रिल 2019 : आरोग्य,शिक्षण आणि सामुदायिक विकास या क्षेत्रांमध्ये सामाजिक परिवर्तन घडविणार्‍या पर्सिस्टंट फाऊंडेशनला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.पर्सिस्टंट सिस्टिम्स लि.ने या फाऊंडेशनच्या कार्याची बीजे 1995 पासूनच रोवली होती आणि या फाऊंडेशनची स्थापना अधिकृतरित्या 2009 मध्ये झाली.पर्सिस्टंट फाऊंडेशनचा प्रवास 40 हून अधिक सामाजिक संस्थांशी सहयोग करून सुरू झाला,ज्यामध्ये समाज परिवर्तनावर लक्ष केंद्रित केले गेले.1995 मध्ये टाकलेेल्या छोट्या पावलांपासून आजवर पडलेल्या प्रभावाचे अधिकृत मूल्यमापन 2018 मध्ये पूर्ण करण्यापर्यंत पर्सिस्टंट फाऊंडेशनने सामाजिक विकास केंद्रस्थानी ठेऊन अनेक उपक्रम राबविले आहेत.

10 वर्षाचा हा टप्पा साजरा करण्यासाठी पर्सिस्टंट फाऊंडेशन वर्षभर विविध उपक्रम हाती घेणार असून याची सुरूवात पर्सिस्टंट सिस्टिम्स पुणे येथे काही निवडक कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रकल्प (सीएसआर) प्रदर्शित करण्यापासून झाली.वर्षभर घेण्यात येणार्‍या उपक्रमांमध्ये विचारांची देवाण-घेवाण,एनजीओज व फाऊंडेशनच्या कार्यक्षेत्रात काम करणार्‍या विविध कंपन्यांच्या सीएसआर विभागाच्या सर्वोत्तम कार्यपध्दतीची देवाण-घेवाण यांचा समावेश आहे.हे सर्व उपक्रम पर्सिस्टंटच्या भारतातील केंद्रामध्ये होणार असून फाऊंडेशनच्या मूळ कार्यक्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा देखील सहभाग असेल.

पर्सिस्टंट सिस्टिम्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.आनंद देशपांडे म्हणाले की, पर्सिस्टंट सिस्टिम्समध्ये हा आमचा ठाम विश्‍वास आहे की, कंपनी व आपले कर्मचारी हे समाजाचा एक अविभाज्य भाग आहे आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे,की आपण ज्या जगात राहतो त्याच्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे.आमचे प्रयत्न हे 1995 मध्ये सुरू झाले व त्यावेळेस आमच्या नफ्याच्या एक टक्का रक्कम आम्ही सामाजिक कार्यासाठी देण्यास सुरू केले.2009 मध्ये स्थापित झालेल्या पर्सिस्टंट फाऊंडेशन बरोबरच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या आमच्या प्रयत्नांना एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.फाऊंडेशन तर्फे आरोग्य,शिक्षण आणि सामुदायिक विकास या क्षेत्रात यशस्वी व परिणामकारक प्रभाव पडावा या दृष्टीने कंपनीने आपल्या प्रयत्नांना व आपल्या कर्मचार्‍यांच्या योगदानाला दिशा दिली.गेल्या 10 वर्षांत त्यांच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे.शाश्‍वत सामाजिक विकास व्हावा या दृष्टीने दीर्घकालीन ध्येयांवर हे फाऊंडेशन लक्ष केंद्रित करत असून त्यासाठी मी शुभेच्छा देतो.

पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या अध्यक्ष सोनली देशपांडे म्हणाल्या की,एकावेळी एक प्रकल्प व एक उपक्रम अशा पद्धतीने काम करून सामाजिक बदलासाठी अथक प्रयत्न करीत असताना आम्ही या प्रवासाची 10 वर्षे पूर्ण केली असल्यामुळे पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या संपूर्ण टीमसाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. सामाजिक विकास,सुधारित आरोग्य सेवा आणि दर्जेदार शैक्षणिक सुधारणा या विविध क्षेत्रांमध्ये अर्थपूर्ण सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी सुरु असलेल्या आमच्या प्रयत्नांना आलेले यश पाहून आम्हांला अतिशय समाधान वाटत आहे.

या सर्व प्रवासामध्ये शासकीय स्तरावरून, विविध शैक्षणिक संस्थांकडून, स्वयंसेवी संघटनांकडून आणि पर्सिस्टंट सिस्टीमच्या सर्व कर्मचार्‍यांकडून फाऊंडेशनच्या कार्यासाठी मिळालेल्या बहुमोल अशा पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल आम्ही या सर्वाचे आभारी आहोत. याच सर्व प्रयत्नांचा आमचा अर्थपूर्ण आणि विलक्षण असा प्रवास यंदाच्या वर्षीच नव्हे तर येत्या आगामी काळातही असाच कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहू, तसेच अत्यंत परिणामकारक आणि दीर्घकाळ कायम राहणारे सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याकरीता आम्ही कटिबध्द आहोत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.