Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १०, २०१९

आता जिल्हयातच करा दहा वर्ष सेवा




एकाच शाळेत किमान ३ वर्ष

नागपूर / अरूण कराळे
जिल्हयातील एकूण सेवा किमान १० वर्षे व विद्यमान शाळेत किमान ३ वर्षे सेवा झाल्याशिवाय जिल्हा परिषद शिक्षक बदलीस पात्र ठरणार नाही असा शासन आदेश पारीत झाला आहे . त्यामुळे जि.प. शिक्षकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे .
यापूर्वी जिल्ह्यात १० वर्षे सेवा झालेला शिक्षक दरवर्षी बदलीसाठी पात्र ठरत असल्याने सदर बदली धोरणात बदल करण्याची मागणी सर्व शिक्षक संघटनांनी लावून धरली होती पण शासनाने काहीच प्रतिसाद दिलेला नव्हता.
शेवटी कोर्टानेच शासनाचे कान टोचले व बदल करण्यास भाग पाडले आहे.
परंतु सदर बदल विशेष संवर्ग १ व २ मधील शिक्षकांसाठी सुदधा लागू आहे किंवा नाही याबद्दल संभ्रम निर्माण करणारा आहे. सदर संभ्रम दूर करून शासनाने शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.