Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १०, २०१९

वाडी नगरपरिषद तर्फे स्वयंसिद्ध उद्योजक मेळावा




महीला व बालकल्याण समीतीचा स्तृत्य उपक्रम


वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
वाडी नगर परिषद अंतर्गत महीला व बालकल्याण समीतीच्या वतीने जागतीक महीलादिना निमीत्य शुक्रवार ८ मार्च रोजी शिलादेवी पब्लीक स्कूलच्या समोरील मैदानावर स्वयंसिद्ध उद्योजक मेळावा पार पडला . सर्वप्रथम जीजामाता ,सावीत्रीबाई फुले , भारतमाता व रमाईच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . मेळाव्याचे उदघाटन आ . समीर मेघे यांनी माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे यांच्या अध्यक्षतेखाली वाडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक , प्रमुख वक्त्या अरूणा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आले .महीलांनी लघू उद्योगाची कास धरून उंच भरारी घेऊन एक यशस्वी उद्योजीका व्हावी हे उद्दीष्ट ठेवून बालकल्याण व महीला सभापती कल्पना सगदेव यांच्या पुढाकाराने स्वयंसिद्ध उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . या मेळाव्यात वाडी नगर परिषद क्षेत्रातील होतकरू महीला तसेच बचत गटातील महीलांनी खादय पदार्थाचे तसेच इतर गृहपयोगी वस्तूंचे एकुण ३५ स्ट्राल लावले होते . या सर्वच स्टॉलवर नागरीकांनी गर्दी केली होती . या स्टॉलवरील महीला उद्योजिका भाग्यश्री काळे यांनी सांगीतले की महीला सुध्दा उत्तम उद्योजीका होऊ शकते असा आत्मविश्वास मिळाला . सहभागी महीला उद्योजिकांना वाडी नगर परिषद तर्फे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले .
प्रास्तावीक आयोजक कल्पना सगदेव , संचालन नगरसेवीका सरीता यादव , आभार प्रदर्शन अॅड . श्रीराम बाटवे यांनी केले . यावेळी सभापती शालीनी रागीट सभापती मीरा परिहार , सभापती नीता कुणावार , उपसभापती आशा कडू ,नगरसेवक दिनेश कोचे , केशव बांदरे ,राकेश मिश्रा , कैलाश मंथापूरवार,अस्मीता मेश्राम, मंगला वाघमारे , सौ .राजुताई भोले , नंदा कदम ,ज्योती भोरकर , मंगला पडोळे , चंद्र प्रभा खोब्रागडे , उर्मिला चौरसीया , महेश रागीट , राम अवलंब यादव , मनोज रागीट प्रामुख्याने उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.