सुप्त गुणांचा विकास म्हणजे व्यक्तिमत्वाची जडणघडण - माजी मंत्री रणजितबाबू देशमुख
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे
व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया असते . महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना आपल्या सुप्त गुणांना वाव देणे गरजेचे आहे . त्यासाठीच महाविद्यालयात वार्षिकोत्सव साजरा केला जातो प्रत्येक विद्यार्थ्यानी या कार्यक्रमात भाग घेणे गरजेचे आहे . शरीर, मन व बुध्दीचा विकास झाल्याशिवाय व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. आपल्यामधील सुप्त गुणांची जाणीव होवून त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आत्मविश्वास आणि परीश्रमाची गरज असते .स्पर्धेच्या युगात स्वयं मुल्यमापन वाचन, जिज्ञासा, नेतृत्वगुण क्षमता, सकारात्मक विचार, नवोन्मेष, स्मार्ट वर्क व स्वतःला सतत अपडेट ठेवणे गरजेचे आहे .विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य प्रयास २०१९ च्या माध्यमातून होत असून आपल्यामधील सुप्त गुणांचा विकास म्हणजे व्यक्तिमत्वाची जडणघडण आहे असे प्रतिपादन व्हीएसपीएम अॅकाडमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूरचे अध्यक्ष माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांनी केले .
व्हीएसपीएम अॅकाडमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूर द्वारा संचालीत वाडीतील जवाहरलाल नेहरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रयास- २०१९ पाच दिवशीय वार्षिकोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते . उदघाटन शनिवार ९ मार्च रोजी रातुम नागपूर विद्यापीठाचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ . प्रमोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख पाहूणे म्हणून व्हीएसपीएम अॅकाडमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूरचे सचिव युवराजजी चालखोर , प्राचार्य डॉ . जीवन दोंतुलवार प्रामुख्याने उपस्थित होते . याप्रसंगी क्रिडा स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , मेहंदी स्पर्धा , आनंद मेळावा , समुह नृत्य , फॅशन शो, गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या . यावेळी डॉ . नितीन कोंगरे यांची रातुम नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवडुन आल्याबद्दल, डॉ . संजय टेकाडे यांची गोंडवाना विद्यापीठात अभ्यास मंडळावर नामनिर्देशन झाल्याबद्दल , डॉ . सुभाष ताडे यांची रातुम नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नामनिर्देशन झाल्याबद्दल माजी मंत्री रणजितबाबू देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक प्राचार्य डॉ . जीवन दोंतुलवार, संचालन आभार प्रयास २०१९चे संयोजक डॉ . कल्पना बोरकर , आभारप्रदर्शन डॉ .सुमित सिंग यांनी केले .आयोजनासाठी डॉ . संजय टेकाडे, डॉ . सुभाष शेंबेकर, डॉ . मनिष चव्हान , डॉ . नरेंद्र घारड,डॉ . सुभाष ताडे, डॉ . नितीन कोंगरे , डॉ . चेतना लढ्ढा , डॉ . नभा कांबळे, डॉ . मनिषा भातकुलकर, डॉ . अर्चना देशमुख , डॉ . कल्पना मंडलेकर, डॉ . प्रेमलता कुऱ्हेकर, डॉ .लीना फाटे , मिलिंद पाटील, दिनेश मानकर , हर्ष कापसे , सतिश नवघरे आदींनी सहकार्य केले .