Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०१, २०१९

मराठी संघाच्या खटाव तालुकाध्यक्षपदी सतीश डोंगरे

मायणी :- ता.खटाव जि.सातारा

 मायणी ता खटाव येथील पत्रकार सतीश डोंगरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खटाव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती सातारा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कोळी  यांनी दिली. 

संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरी पत्रकारिता यांच्या समस्या तसेच पत्रकारांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची ओळख आहे .राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनखाली हा संघ कार्यरत असून खटाव तालुक्याच्या अध्यक्ष पदी ऑनलाईन न्यूज पोर्टल ,न्युज चॅनेल ,विविध दैनिक तसेच प्रेस फोटोग्राफर यासारख्या माध्यमातून सामाजिक जोपासना करणारे सतीश डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल राज्य संघटक संजय भोकरे , राज्याध्यक्ष राजा माने, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे , जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे उपाध्यक्ष दत्ता कोळी यांनी अभिनंदन केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.