Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०१, २०१९

सिंदेवाही तालुक्यातील मतदानापासून वंचित

मतदान नोंदणी करून घ्यावे-  

तहसीलदार अमोल पाठक  यांचे आवाहन।

प्रशांत गेडाम/सिंदेवाही : 

 सिंदेवाही तालुक्यातील पात्र व्यक्ती मतदार मतदान करण्यापासून वंचित राहू नये याकरता तालुका स्तरावर मतदार नोंदणी मोहीम सुरू असून प्रत्येक गावात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे .याचाच भाग म्हणून सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येक गावागावात दिनांक 2 मार्च व 3 मार्च रोजी मा. तहसीलदार पाठक साहेब यांच्या मार्गदर्शन व शासनाच्या आदेशानुसार विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हे कॅम्प गावातील ज्या ठिकाणी मतदान केंद्र म्हणून घोषित केले आहे. त्या शाळा अंगणवाडी, ग्रामपंचायत तसेच शासकीय कार्यालय येथे शासनाने नियुक्त केलेल्या बी एल.ओ. मार्फत घेतले जातील. बी. एल. ओ . कडून संपूर्ण माहिती व विहित नमुन्यातील व त्यासाठी लागणारे दस्ताऐवज याची संपूर्ण माहिती करून घ्यावी व आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरता ही शेवटची संधी असल्याचे मा. तहसीलदार यांनी पत्रकार  परिषदेत सांगितले.  या यामध्ये नुकतेच वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले तरुण-तरुणी नव विवाहिता, तसेच ज्यांच्या  कुटुंबातील कोणी व्यक्ती हयात नाहीत त्यांचे नाव मतदान यादीतून कमी करणे इत्यादी कामे कॅम्प मध्ये करण्यात येणार आहेत .तरी आपण पात्र व्यक्तींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा सिंदेवाही तहसीलदार मा. पाठक साहेब यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.