Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर ०१, २०२०

धक्कदायक :ताडोबा सफारीसाठी निघालेल्या पर्यटकांच्या गाडीचा अपघात;दोघांचा मृत्यू

खबरबात/चंद्रपूर:
ताडोबाला जाऊन मस्त मज्जा करू जंगलाचा आनंद लुटू अशी हौस मनात ठेऊन सफारीला निघालेल्या पर्यटकांच्या वाहनाला अपघात झाल्याने या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज सकाळी १०. वाजताच्या सुमारास घडली. तर या अपघातात गाडीतील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सना अग्रवाल असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10.30 च्या सुमारास चिमूर तालुक्यातील कोलारा प्रवेशद्वाराकडून एक वाहन पर्यटकांना घेऊन ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी येत होती. 
त्यावेळी मासळ गावाजवळ भडगा नाल्यात वाहनावरून नियंत्रन सुटल्याने या पर्यटकांचे वाहन कोसळले. यामुळे गाडीतील सर्वच प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.यातील सना अभिषेक अग्रवाल,व आणखी एक पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे, चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय ३८ वर्षे सह मिनू अमिनेश अग्रवाल ३२ वर्षे , नेहा आशिष अग्रवाल, ईशु अनिमेश अग्रवाल वय १७ वर्षे असे एकूण ६ जण होते.या सहा पैकी २ जनांचा मृत्यू झाले असून ४ जणांवर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.