चंद्रपूर/ प्रतिनिधी
आजच्या दिवशी म्हणजे 1 मार्च 2017 रोजी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली होती. या दोन वर्षात प्रत्यक्ष श्रमदान केल्याचे एकूण दिवस सुद्धा आज 650 दिवस पूर्ण झाले आहे. या अभियानला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच पांढरकवङा येथील दौ-यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरभरुन कौतुक केले होते. त्यापूर्वी त्यानी मन की बात मधून पाठ थोपटली होती.
इको-प्रो च्या कार्यकर्त्यांनी उन-वारा-पाऊस-थंडी कशाची तमा न बाळगता रोज नियमित सकाळी 06:00 am ते 09:00 am श्रमदान करून किल्ला स्वच्छ करित आहेत.या श्रमदान मधून मागील दोन वर्षात गोंड़कालीन इतिहास, ऐतिहासिक वास्तु आणि त्यांचा इतिहास नव्याने समोर आला, चंद्रपुरकर हेरिटेज वॉक या इको-प्रो च्या उपक्रमातुन चंद्रपुर मधील ऐतिहासिक वास्तु पर्यटन चा आंनद घेत आहेत.
'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनसाठी राष्ट्रीय स्तरावर संदेश देता यावा म्हणून चंद्रपुर शहरातील ऐतिहासिक 11 किमी लांब असलेला किल्ला-परकोट स्वच्छता अभियान ची सुरुवात करण्यात आली होती. सदर अभियान यशस्वी करण्यास शहरातील विविध संस्था-व्यक्तिनि आवश्यक साहित्य पुरविले. किल्ला स्वच्छता अभियान मधील इको-प्रो सहकारी साथी तसेच श्रमदान करिता वेळोवेळी सहभागी झालेले महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, शहरातील नागरिक, युवक यांचे सुद्धा या अभियानात सहकार्य लाभले.
किल्ला स्वच्छता अभियानमुळे दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तुकड़े पुरातत्व विभागाचे लक्ष वेधन्यात इको-प्रो ला यश प्राप्त झाले. यात प्रामुख्याने किल्लाच्या परकोट भिंतिच्या टुटलेला भागाची पुनरबांधनी, गोंडराजे समाधी स्थळ सोन्दर्यीकरण, गोंडराजे राजमहल आजचे कारागृह, जूनोना जलमहल, किल्लाच्या सभोवताल संरक्षण भिंत आणि त्यामधुन पाथ वे, सायकल ट्रैक, पर्यटन दृष्टीने विकास आदि विषयाचा आहेत.
सध्या सुरु असलेले इको-प्रो चे श्रमदान
रामाला तलाव ला लागून असलेली किल्ला भिंत आणि त्यामधुन निघालेले झाडे-झुडपे काढन्याचे कठिन काम सुरु आहे. या झाड़ी-झुडुपमुळे किल्लाच्या भिंतिस तड़े जात असून तसेच किल्ल्याचे सौन्दर्य सुद्धा बाधित होत असल्याने ते काढन्याचे काम सुरु आहे. यापूर्वी थोड़ा भागाची स्वच्छता करून त्यावर लाइट लावून यशस्वी प्रयोग इको-प्रो ने केला असून संपूर्ण स्वच्छते नंतर महानगरपालिका कडून यावर कायम लाइट चा प्रकाश रात्रीच्या वेळेस सुरु केल्यास रामाला तलाव परिसर पर्यटन दृष्टया अधिक महत्वाचे ठरणार आहे.