Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

अवघ्या चार महिन्यात पती बेपत्ता

पत्नीवर कोसळलं दुःखाच डोंगर
चंद्रपूर/रोहित रामटेके
चंद्रपूर:- सारंगीपुर येथे राहत असलेला बिनाज्या मोहनसिंग कुमारिया आणि जिवती तालुक्यात राहणारी समीक्षा यांच्या खूप दिवसापासून जीवापाड प्रेम असल्यामुळे मुलाच्या आई बाबाच्या सहमतीने २३/११/२०१८ ला त्यांच्या राहते घरी सारंगीपुर ता.आर्वी जी.वर्धा येथे त्यांचा विवाह करण्यात आला होता. त्यानंतर दोघे पती पत्नी मिळून सुखात संसार करीत चंद्रपूर या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून राहत होते. 
    ११/०२/२०१९ ला अचानक बीनाज्या ची तब्बेत बिघडल्याने पत्नी ने त्याला आराम करायला लावला असता त्याने नकार देऊन त्याने तिला कामाला पाठवले व स्वतः कामाला जातो असे तिला सांगत घरीच राहला आणि आपल्या कामाच्या मालकाला फोन करून त्याने त्याला खोटे सांगितले की, "मी दवाखाण्यात भरती आहे तर आज कामाला येणार नाही" असे आपल्या मालकाला सांगून तो घरून आपला व आपल्या पत्नीचा मोबाईल फोन घेऊन  निघून गेला. नंतर पत्नीने घरी आल्यावर चौकशी करणे सुरू केली असता, पतीच्या काममालकाकडून पती खोट बोलल्याचे कडल्याने तिच्या पायाखालील जमीनच सरकत गेली.पतीसोबत  फोन ने सम्पर्क केला तर फोन बंद करून ठेवल्याने तिने २ दिवस पतीची वाट पाहत नंतर रामनगर पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार १३/०२/२०१९ ला करण्यात आली होती.
      या संदर्भात आपल्या सासुरवाडीला समीक्षाने चौकशी केली पण सासुसासऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे समीक्षा चे चंद्रपूर तसेच इतर कुठेही कोणीही आहेत नाही यामुळे त्यांनी महिला दलित सेनाच्या संदर्भातून आपल्या पतीचा शोध लवकरात लवकर लागावा व पती सुखरूप सोबत यावा यासाठी महिला दलित सेनाच्या जिल्हाध्यक्षा सौ. सारिका उराडे, सौ. करुणा येचलवार, राशी उराडे, सौ. नितु ठाकूर आणि प्रशांत रामटेके यांनी जिल्हा  पोलीस अधीक्षक  यांना निवेदन देण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.