Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १७, २०१९

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

manohar Parrikar

पणजी 17 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी निधन झाले. गेली काही महिने त्यांच्यावर गोव्यातच त्यांच्या निवासस्थानी उपचार सुरू होते. ते 63 वर्षांचे होते. प्रकृती ठिक नसतानाही ते मुख्यमंत्री कार्यालयात कामकाज बघत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. रविवारी त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. त्यामुळे श्वास घेण्यासही त्यांना अडचण जात होती. शेवटी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंझ अखेर संपली.

पर्रिकरांना स्वादुपींडाचा कर्करोग झाले होता. वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतल्या लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सुरूवातीला उपचार झाले. नंतर अमेरिकेत न्यूयॉर्कमध्येही त्यांच्यावर काही महिने उपचार झाले. नंतर पर्रिकरांना अमेरिकेतून सुट्टी देण्यात आली होती.

अमेरिकेतल्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अशा परिस्थितही लढवय्या पर्रिकरांनी गोव्याचं कामकाज पाहिलं. एवढच नाही तर काही आढवड्यांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्पही विधानसभेत सादर केला होता. तज्ज्ञ डॉक्टरांच पथक त्यांच्यावर त्यांच्या निवासस्थानीच उपचार करत होतं.

अतिशय प्रमाणिक, साधी राहणी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले पर्रिकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. 2014 च्या निवडणुका झाल्यानंतर मोदींनी त्यांना खास दिल्लीत बोलावून घेतलं होतं. मात्र गोव्याच्या निसर्गात रमणारे पर्रिकर दिल्लीत फारशे रमलेच नाहीत. त्यांनी गोव्यात परत येण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.