Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

जयश्री कांबळे यांचा सत्कार

नूतन पी. एस. आय जयश्री कांबळे हीचा सत्कार करताना रिपाइंचे अध्यक्ष अशोक गायकवाड,सरतापे मॅडम व अन्य मान्यवर

मायणी, ता.खटाव जि.सातारा

नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला त्यामध्ये मायणी ता.खटाव अनफळे गावची कै.आबासो कांबळे यांची कन्या जयश्री कांबळे हीचा अनुसूचित जात प्रवर्गात महाराष्ट्र १४ वा क्रमांक मिळाला त्याबद्दल

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्याकडून सातारा येथे झालेल्या कार्यक्रमत तिचा सत्कार करण्यात आला व केलेल्या कामगिरीवर कौतुक करण्यात आले

सातार्‍यात आयोजित रिपाइंच्या एल्गार परिषदेत रिपाइंचे अशोकराव गायकवाड यांनी तिचा सत्कार केला. यावेळी रिपाइंचे जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते. जयश्री कांबळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करून समाजातील विद्यार्थ्यांना दाखवून दिले की प्रयन्त केले की यश हे निश्चित मिळवता येते .तिला तिच्या घरच्यांचा आईभाऊ व तिचे पती या सगळ्यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला म्हणून तिला हे यश मिळवता आले असे यावेळी तिने सांगितले. याचा सार्थ अभिमान त्याबाबत अशोकराव गायकवाड म्हणाले, हा जिल्हा सावित्रीमाईचा व जिजाऊंचा जिल्हा आहे. जिल्ह्यातल्या लेकींना जिल्ह्याचे नाव काढल्याने आम्हा . जिल्हावालियांना याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. -


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.