Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

निर्माणाधीन नागपूर- पारडी उड्डाणपुल कोसळला |






 2014 मध्ये उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले. ते 3 वर्षात पूर्ण होणार होते आणि आजपर्यंत प्रलंबित आहे. आता, हे अगदी स्पष्ट आहे की त्याची गुणवत्ता देखील चांगली नाही. कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या भारतनगर चौकात निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास कोसळला. या पुलाचा एक भाग पडण्याआधी तेथून एक चारचाकी गाडी गेली होती. या गाडीत अख्खे कुटुंब होते. अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने या कुटुंबियांचे प्राण वाचल्याची चर्चा येथे होत होती. पारडी येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे या भागातील नागरिकांसह शहरातील वाहनचालकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. या पुलाच्या कामासाठी दुसऱ्यांदा वाढवून देण्यात आलेली मर्यादा बांधकाम पूर्ण होण्यास पुरेशी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता वर्षाअखेर पुलाचे काम पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच बांधकाम कोसळल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

#Nagpur #construction #Pardi #flyover #collapsed 






Nagpur: A part of under-construction Pardi flyover of National Highways Authority of India collapsed around 30 minutes ago. Fortunately, no one injured Bhoomipuja of this flyover held in 2014 and was supposed to complete in 3 years and pending till date. Now, it is very clear that its quality also not good. Not expected when its minister (Nitin Gadkari) is from the city itself.








SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.