Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १०, २०२०

डिजिटल मीडिया असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर




अध्यक्षपदी जितेंद्र चोरङिया यांची निवड

चंद्रपूर/प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील वेबपोर्टल व वेबसाइट संचालकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत डिजिटल मीडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली. यावेळी सर्वानुमते कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी जितेंद्र चोरडिया यांची एकमताने निवड करण्यात आली. 

बदलत्या काळानुसार बातम्यांचे स्त्रोत आणि माध्यम बदलत असून, ऑनलाइन डिजिटल मीडियाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व समाजात कानाकोपऱ्यात बातमीची सत्यता आणि वेगाने माहिती पोहोचण्याच्या दृष्टीने सर्व पोर्टलधारक कटिबध्द असून, अफवांवर आळा घालण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.  समाजहिताच्या दृष्टीने आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने व्यापक दृष्टिकोन ठेवून डिजिटल मिडिया असोसिएशनची स्थापना करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाभरातील सर्व डिजिटल मीडिया धारकांच्या बैठकीत कार्यकारणीवर चर्चा करण्यात आली. याशिवाय भविष्यातील रुपरेषा ठरवून विचार मंथन करण्यात आले. असोसिएशनच्या अध्यक्षपदी जितेंद्र चोरङिया यांची एकमताने निवड झाली. यावेळी कार्याध्यक्षपदी विजय सिद्धावार, सचिव पदी राजू बिट्टूरवार, कोषाध्यक्ष जितेंद्र जोगङ यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी दीपक शर्मा, हिमायू अली, मनोज पोतराजे, सहसचिवपदी तुळशीराम जांभुळकर, दिनेश एकवनकर, राजू कुकङे यांचा समावेश आहे, तर तांत्रिक सल्लागार म्हणून देवनाथ गंङाटे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रकाश हांडे, मनोहर दोतेपेल्ली, संजय कन्नावार, आशीष रैच, अनंता गोखरे, विठ्ठल आवळे, मनोज कनकम, प्रणयकुमार बंङी, अरुण वासलवार, सुरेश ङांगे, रोहित तुराणकर, होमदेव तुम्मेवार,  देवा बुरडकर यांचा समावेश आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.