Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ११, २०२०

व्हायरसमुळे काॅम्युटरचा वेग वाढणार

  व्हायरसमुळे वाढणार कॉम्प्युटरचा वेग ! 


==============================================

माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव  

व्हायरसमुळे अनेक कॉम्प्युटर बिघडत असलेले आपण ऐकतो किंवा पाहतो. मात्र, संशोधकांनी ‘काट्याने काटा काढणे’ ही म्हण याबाबतही सिद्ध करण्याचे ठरवले आहे. त्यांनी ‘व्हायरस’चा वापर करून कॉम्प्युटरचा वेग आणि मेमरी वाढवण्याचा मार्ग शोधला आहे.‘अ‍ॅप्लॉईड नॅनो मटेरियल्स’मध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. संशोधकांनी ‘एम13 बॅक्टेरियोफेज’ व्हायरसच्या मदतीने कॉम्प्युटरचा वेग सुधारण्यात यश मिळवले आहे.
हा व्हायरस प्रामुख्याने ई-कोली बॅक्टेरियाला संक्रमित करीत असतो. संशोधकांनी सांगितले की, कॉम्प्युटर वेगवान करण्यासाठी त्याच्या मिलीसेकंद टाईम डिलेला कमी करणे गरजेचे आहे. हे टाईम डिले म्हणजेच विलंब होण्याचे कारण रँडम अ‍ॅक्सेस मेमरी (रॅम) आणि हार्ड ड्राईव्ह यांच्यामधील डाटा ट्रान्सफर व स्टोरेज. सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईनच्या संशोधकांनी म्हटले आहे की, फेज-चेंज मेमरी या समस्येला दूर करू शकते. ती रॅमप्रमाणे वेगवान असते आणि त्यामध्ये हार्ड ड्राईव्हपेक्षा अधिक डाटा स्टोअर होऊ शकतो. मात्र, या प्रक्रियेत तापमान मोठी समस्या आहे. ‘एम13 बॅक्टिरियोफेज’ व्हायरसच्या मदतीने अतिशय कमी तापमानातच या मटेरियलला वायरमध्ये समाविष्ट करून कॉम्प्युटर चिपमध्ये वापरता येते.*   

माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.