Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

सकल कुणबी संघाच्या अधिवेशनात अनेक ठराव मंजूर

kavyashilp Digital Media



हजारो समाजबांधवांची उपस्थिती 

नागपूर / अरूण कराळे
सर्व शाखीय सकल कुणबी समाजाचे पहिले अधिवेशन आज हिंगणा येथील रेणुका सभागृहात हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडले. या मेळाव्यात २५ च्या वर ठराव मंजूर करण्यात आले. अधिवेशनाचे उदघाटन डॉ .बबनराव तायवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर बहुउद्देशीय कुणबी संघाचे अध्यक्ष सुरेश गुडधे,अखिल कुणबी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे, झोड कुणबी संघाचे अध्यक्ष वामनराव उमरे, खैरे कुणबी संघाचे भुणेश्वर आरिकर, कुणबी सेनेचे सुरेश वरसे, झाडे कुणबी संघाचे मोरेश्वर फुंडे, मराठा सेवा संघाचे दिलीप खोडके, खैरे कुणबी विकास परिषदचे किशोर येडे, महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समितीचे शेखर काकडे, तिरळे कुणबी सेवा संघाच्या वैशाली चोपडे,अखिल खेडूला कुणबी संघाचे प्रभाकर पिलारे, जाधव कुणबी संघाचे विलास सोनारे, महिला आघाडीच्या वनिता केदार, तालुका व्यवस्थापन समितीचे नाना सातपुते, तिरुपती बालाजी बॅक व बालाजी हायस्कूलचे संचालक दामोदर सांगोले प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वानुमते अधिवेशनाच्या सभापतीपदी डॉ .बबनराव तायवाडे तर उपसभापती दीनानाथ पडोळे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात कुणबी समाजाच्या विविध प्रश्नांवर ठराव घेण्यात आले. यात शेतकरी व कृषी संबंधित, कुणबी/ओबीसींना दिल्या जाणाऱ्या सवलती व प्रामुख्याने विद्यार्थी, तरुण ,बेरोजगार महिला यांच्या मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. स्वामींनाथन आयोग,मंडल आयोग लागू करून केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे आदी ठराव घेण्यात आले. सूत्रसंचालन बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाचे सचिव प्रदीप ठाकरे तर आभार प्रदर्शन रवींद्र देशमुख यांनी केले .अधिवेशन दरम्यान माजी खासदार नाना पटोले, आमदार समीर मेघे, माजी आमदार विजय घोडमारे,नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी भेटी देऊन सकल कुणबी संघाच्या पाठीमागे असल्याचे सांगीतले . आयोजनाकरीता व्यवस्थापन समितीचे नाना लापकाले,रघुनाथ मालिकर,प्रभाकर देशमुख, दिलीप काळबांडे,अशोक चौधरी,उज्वला बोढारे,अरुण भेंडे, बबनराव आव्हाले, प्रकाश भोगे, प्रवीण खाडे,शिरीष देशमुख, आशिष पुंड,प्रकाश भोगे, राजू मोहोड, बाजीराव सरटकर,विनोद उमरेडकर,संजय बोंडे, बालू मोरे, आबा काळे, राम आवारी, राजू वानखेडे,मिथिलेश कान्हेरे, संजय हुरपटे, नाना शिंगारे,विनोद ठाकरे, बंडू बोंडे, किशोर फाटकर, वामनराव काळे अविनाश गोतमारे, विजय घोडमारे, अनिल फुके आदींनी सहकार्य केले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.