Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

वाडी न .प. स्वच्छतेत एक पाऊल पुढे

kavyashilp Digital Media


वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
नुकत्याच झालेल्या शासन पाहणी दौर्‍याच्या अहवालानुसार स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१९ च्या टीम सर्वेमध्ये वाडी नगर परिषद महाराष्ट्रात स्वच्छतेत वाडी एक पाऊल पुढे असल्याचे दिसून आले . नगर परिषदच्या स्वच्छता व आरोग्य विभागाने वाडी शहरास स्वच्छ ठेवण्यास तारेवरची कसरत केली जेमतेम साडेतीन वर्ष झालेल्या नगरपरिषदनी कमी कालावधीत उंच झेप घेतल्याचे समाधान मुख्याधिकारी राजेश भगत यांनी व्यक्त केले. नगर परिषदेने सुरू केलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राला युवावर्ग तसेच शाळेतील विद्यार्थी भेट देऊन खत निर्मितीची प्रक्रिया व मानवी जीवनाशी असलेला सहसंबंध या विषयी माहीती जाणून घेत आहे .
मुख्याधिकारी राजेश भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या व ४० हजार १४७ मतदार असलेल्या वाडी नगर परिषदने २०१९ मध्ये राबविलेल्या स्वच्छता अभियानात वाडी परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ज्या उपाय योजना तसेच नियोजन आखण्यात आले. याला २०१८ च्या तुलनेत भरपूर यश मिळाल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या २०१९ च्या स्वच्छता सर्वेक्षणात पश्‍चिम विभागातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील एकूण १००२ नगर परिषदमधून वाडी नगरपरिषदेला ११७ वा क्रमांक आहे. जेव्हा की २०१८ मध्ये १७२ वा क्रमांक होता. तसेच महाराष्ट्र राज्यात एकूण ३४१ नगर परिषदा असून, त्यात वाडी नगर परिषदचा ९४ वा क्रमांक आहे. २०१८ चा विचार करता यावर्षी ४३ क्रमांकाने झेप घेतली आहे. २०१८ मध्ये वाडी नगर परिषद १३७ क्रमांकावर होती. २५ वॉर्ड संख्या असलेल्या व नव्यानेच स्थापना झालेल्या नगर परिषदची अवघ्या ४ वर्षांत २ तारांकितचा दर्जा प्राप्त करीत ५ व्या तारांकित दर्जा प्राप्तीसाठी अधिक सुधारणेची व नवनवीन योजना, प्रकल्प राबवित आहे. वाडी शहर स्वच्छ करीत असताना एकत्र करण्यात आलेल्या कचर्‍यातून ओला कचरा व सुखा कचर्‍याचे वर्गीकरण करून ओला कचर्‍यापासून कम्पोस्ट खत व सुका कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो. वाडी शहर स्वच्छ ठेवण्यात नागरिकांचे सहकार्य मिळावे, त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी वाडी शहरातील मुख्य रस्त्यावर व झोपडपट्टी भागात आकर्षक भिंती चित्रे रंगविलेली आहेत. शहरातील नगर परिषदेने बांधलेली सर्वच शौचालये आकर्षक रंग रंगोटी करून सजविलेली आहे. त्यामुळे नागरीक शौचालयासाठी बाहेर जाण्याचे प्रमाणच कमी झाल्याचे दिसून येते. नागरिकांचे अशाचप्रकारे सहकार्य मिळाले तर पुढील काळात पूर्णत: स्वच्छ वाडी, सुंदर वाडी झाल्याशिवाय राहणार नाही .असे मनोगत मुख्याधिकारी राजेश भगत ,नगराध्यक्ष प्रेम झाडे, उपनगराध्यक्ष राजेश थोराने , स्वच्छता व आरोग्य सभापती शालीनी रागीट, आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे व शहर समन्वयक पिंकेश चकोले यांनी व्यक्त करून मिळालेल्या यशाचे संपूर्ण श्रेय नगरपरिषदेच्या सफाई कामगार व वाडी नगरवासियांना दिले आहे .

kavyashilp Digital Media


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.