रायसोनी केंद्रावरचा प्रकार उशिरा पोहचल्याचे कारण
नागपूर / अरूण कराळे:
एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणा औद्योगिक परिसरातील रायसोनी तंत्रनिकेतन या केंद्रावर महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या लेखा-लिपिक पदाची परीक्षा रविवार ३ मार्च रोजी सकाळी १० ते ११ .३० च्या दरम्यान होणार होती.परंतु परीक्षा केंद्रावर नोंदणी करण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी केंद्रावर पोहचणे बंधनकारक होते .
उपरोक्त केंद्रावर एकूण ६५० परीक्षार्थी परीक्षा देणार होते.त्यासाठी अमरावती,अकोला,वाशीम, यवतमाळ,बीड,औरंगाबाद, नांदेड,चांदुर तसेच नागपूर जिल्ह्यातील परिक्षणार्थींचा समावेश होता दुरून वेगवेगळ्या ठिकाणावरून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले असता काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नियोजित वेळेनुसार ५ ते १० मिनिटे वाहतूक साधनांच्या अभावामुळे तसेच केंद्राचा पत्ता शोधतांना वेळ झाल्याने उशिरा परीक्षार्थी केंद्रावर पोहचल्यानी मुख्यप्रवेश फाटक बंद करून केंद्रप्रमुख अमित महाल्य यांनी परिक्षणार्थींना आत येण्यास मज्जाव केल्याने अंदाजे ५० परिक्षार्थी परिक्षेपासून वंचीत राहल्याने विद्यार्थ्यांत रोष निर्माण झाला.यासंबंधीची लेखी तक्रार एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली.
उपरोक्त केंद्रावर महिन्याच्या प्रत्येक शनिवार व रविवारचा विविध स्पर्धात्मक परीक्षा होत असतात परंतु केंद्रावर पोहचण्यासाठी वाहतूक साधनांचा अभाव व केंद्र मुख्य रस्त्यावरून बऱ्याच आत असल्याने केंद्र शोधण्यासाठी परिक्षणार्थीची तारांबळ उडते.भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्र बद्दलविण्यात येण्याची मागणी जोर पकडत आहे.