खटाव माण साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरवात
मायणी/ ता.खटाव:
दुष्काळ व प्रतिकुल परिस्थिती असतानाही खटाव माण कारखाना उभा करण्याचे धाडस आम्ही केले असून आज रविवार दि ३ मार्च पासून प्रत्येक्षात गळीत हंगामास सुरुवात होत असून जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत ऊस दाराच्या बाबतीत खटाव माण अँग्रो कोठेही कमी पडणार नाही , असा ठाम विश्वास कारखान्याचे चेअरमन ,माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केला. ते खटाव माण तालुका अँग्रो प्रो लि पडळ साखर कारखाण्याच्या पहिल्या वाहिल्या ऊस गळीत हंगामास सुरवात होणाऱ्या ऊसमोळी व ऊस भरून आलेल्या ट्रॅक्टर पूजन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी कारखान्याचे को-चेअरमन कराड उत्तर चे भाजपा नेते मनोज दादा घोरपडे , कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,संचालक नंदकुमार मोरे,विक्रम घोरपडे,प्रदीप विधाते,महेश घार्गे ,मुख्यशेती अधिकारी आर के पवार,टेक्निकल डायरेक्टर बालाजी जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
खटाव माण अँग्रो साखर कारखान्याची जबाबदारी उशिरा सुरू झाल्यामुळे वाढली आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे . खटाव माण नावाने कारखाना असल्याने या दुष्काळी तालुक्यासह कराड उत्तरच्या नावलौकिकाला साजेसे काम करु. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण काम करणार असून यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन करताना जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्याच्या तुलनेत दाराच्या बाबतीत मागे राहणार नसल्याचा विश्वासही प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केला.
पडळ.(ता. खटाव ) येथील खटाव माण तालुका अँग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाच्या शुभारंभ निमित्ताने आलेल्या पहिल्या ट्रॅक्टर पुजनाने झाला.यावेळी बोलताना कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे म्हणाले ,कारखान्याच्या उत्पादन खर्चात कपात करुन शेतकऱ्यांच्या पदरात अधिक देण्याचा प्रयत्न आम्ही करु.तसेच भविष्यात राज्यात सर्वाधिक दर देणारा हा कारखाना असेल. कारण ३५०० टीसीडी गळीत क्षमतेच्या साखर कारखान्याबरोबरच १२ मेगावेट वीज निर्मिती ही यावेळी होनार असून ,भविष्यात इथेनॉल आणि प्रक्रिया उद्योगांना चालना देऊ. यातून लोकांच्या रोजगार निर्मितीला हातभार लागेल.
यावेळी प्रसाद बिडकर यांनी सुत्रसंचालन केले. अजित मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला कारखान्याचे अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.