स्थानांतरण झाालेल्या अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ
मूल/प्रतिनिधी:
कोणत्याही देशाची विकासात पत्रकारांची भुमिका महत्वाची आहे. शासनाला,प्रशासनला आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकार करीत असतो. सत्याला सत्य म्हणणे आणि खोटयाचे पितळ उघडे पाडणे हे ख—या पत्रकाराची लक्षणे असल्याचे मत माजी मंत्री शोभाताई फडणविस यांनी व्यक्त केले. स्थानांतरण झालेल्या अधिका—यांसाठी मूल तालूका पत्रकार संघाने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून त्या बोलत होत्या.
पत्रकार संघाच्या नविन वास्तुमध्ये पार पडलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी मंत्री शोभाताई फडणविस, निरोप मुर्ती मूल येथुन स्थानांतरण झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हीरे,संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरबळे, मूल तालूका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा वंदना आगरकाटे,पालीस निरीक्षक मुर्लीधर कासार उपस्थीत होते.
फडणविस पुढे बोलतांना म्हणाले की,पत्रकारांबददल नेहमीच भीती बाळगली जाते.मात्र मूल मधील पत्रकार अपवाद आहेत. मूलचे पत्रकार संघ चांगल्याचा पाठीशी नेहमीच उभे राहते याचा अनेकदा प्रत्येय आल्याचे त्या म्हणाल्या. मूल येथुन स्थानांतरण झालेल्या अधिका—यांना निरोप देण्यासाठी मूल पत्रकार संघाने आयोजीत केललेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी कौतुकाची थाप दिली. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हीरे यांची सोलापूर जिल्हयातील करमाळा उपविभागात,तहसीलदार राजेश सरवदे यांची देवरी येथे स्थानांतरण झाले.
तर संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरबळे यांची राज्य विक्रीकर आयुक्तपदी निवड झाली. या दोन्ही अधिका—यांची मूल येथील कारकिर्द उत्तम प्रकारे पार पडली. त्यांच्या बददल जनतेमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली. या दोन्ही अधिका—यांनी जनतेला दिलेल्या चांगल्या सेवेचे क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रम घेण्यात आल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी प्रास्ताविक करतांना सांगीतले. निरोप मुर्ती विशाल हीरे आणि प्रदीप पांढरबळे यांनी मूल येथील आपल्या सेवा काळातील अनेक आठवणीनां उजाळा देत येथील आपुलकीच्या माणसांचे रूण आपण सोबत नेत असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाला माजी नगर सेवक मोतीलाल टहलीयानी,अनिल संतोषवार,विश्वशांती विद्यालय सावलीचे मुख्याध्यापक ए.पी. शुक्ला,मंडळ अधिकारी किरण घाटे, दीलीप गेडाम,कर्मविर महाविदयालयाचे प्राध्यापक वसंत ताजणे, जगदीश हांडेकर,आदी पाहुणे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संघाचे सचीव विनायक रेकलवार यांनी केले. आभार राजु गेडाम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनात पत्रकार संघाचे सदस्य रविन्द्र बोकारे, अशोक येरमे, युवराज चावरे, रमेश माहूरपवार, भोजराज गोवर्धन,दीपक देशपांडे,सर्च टिव्हीचे प्रतीनिधी अमीत राऊत,एन टिव्हीचे प्रतीनिधी सतीष आकुलवार यांनी सहकार्य केले.