Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०३, २०१९

Nagpur Metro# Expresses Satisfaction at the Work Progress

सीएमआरएस'ने केली मेट्रो प्रकल्पाची पाहणी

सीएमआरएस'ने केली मेट्रो प्रकल्पाची पाहणी
नागपूर/प्रतिनिधी:
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) तर्फे आज दिनांक ३ मार्च रोजी महा मेट्रो नागपूर प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. 'सीएमआरएस'च्या तीन सदस्सीय पथकाचे नेतृत्व श्री अरविंद कुमार जैन, रेल्वे सुरक्षा आयुक्त, केंद्रीय मंडल, मुंबई यांनी केले असून यांच्या सोबत जी. पी. गर्ग, रेल्वे सुरक्षा उपायुक्त आणि श्री इ. श्रीनिवासन रेल्वे सुरक्षा उपायुक्त उपस्थित होते. संपूर्ण दिवस भर चाललेल्या या पाहणी दौऱ्यात महा मेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याची प्रगती आणि प्रकल्पाबद्दल महत्वाची माहिती सीएमआरएस अधिकाऱ्यांना दिली. तत्पूर्वी सविस्तर माहितीसाठी मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन सादर करण्यात आले होते.

यानंतर सर्व प्रथम सीएमआरएस'ने मिहान येथील डेपो'चा दौरा केला. याठिकाणी सीएमआरएस अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कागदपत्रांची पाहणी करून रोलिंग स्टॉकचे निरीक्षण केली. यात मेट्रोच्या इमर्जन्सी फ्रंट डोअर इव्हॅक्यूव्हेशन, आणि सुरक्षा उपकरणांसह कोचेससंबंधित इतर सर्व उपकरणांची तपासणी केली. डेपोत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी अरविंद कुमार जैन यांनी सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली आहे. येथे सीएमआरएस अधिकाऱ्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांना दिला.


यानंतर अनुक्रमे एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि इंटरचेंज मेट्रो स्टेशनची पाहणी केली. प्रवासी सेवेसाठी स्टेशनचे बांधकाम, स्टेशनवर लावण्यात आलेले आटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट्स, अग्निरोधक उपाय, एस्केलेटर, लिफ्ट, विद्युत उपकरणे, टेलिकॉम, आपातकालीन यंत्रणा व इतर सर्व सोयी सुविधांची पाहणी सीएमआरएस'ने केली. दरम्यान एयरपोर्ट स्टेशनवर मॉकड्रिल सादर करण्यात आले. आपातकालीन परिस्थीत मेट्रोचे अधिकारी उत्तमरीत्या कार्य करत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण मॉकड्रिल'च्या माध्यमातून देण्यात आले.

सीएमआरएस पथकाने इंटरचेंज स्टेशन ते साऊथ स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित ब्रेक, आसन व्यवस्था, डिजीटल स्क्रीन, निर्गमन गेट, सवांद कायम ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या उपकरणांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. या संपूर्ण दौऱ्यासाठी महा मेट्रो नागपूर प्रकल्पाचे संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक अँड सिस्टीम्स) श्री. सुनील माथूर, कार्यकारी संचालक(रोलिंग स्टॉक) श्री. जनक कुमार गर्ग, कार्यकारी संचालक(वरिष्ठ मुख्य प्रकल्प अधिकारी) श्री. देवेंद्र रामटेककर, श्री. व्ही के अग्रवाल, महाव्यवस्थापक (प्रशासन) श्री. अनिल कोकाटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी आवश्यक दोन्ही महत्वाच्या चाचण्या यशवस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. आरडीएसओ'ने केलेल्या पाहणी नंतर आरडीएसओ'चे प्रमाणपत्र देखील महा मेट्रोने मिळवले आहे. तर आज सीएमआरएस'ने केलेल्या पाहणीनंतर आता सीएमआरएस प्रमाणपत्र मिळताच प्रवाश्यांना मेट्रोतुन प्रवास करता येणार आहे.

Expresses Satisfaction at the Work Progress


*NAGPUR 03:* 
A 3-member team of Commissioner of Metro Rail Safety (CMRS) conducted inspection of Maha Metro Nagpur project today. The inspection went on for the whole day and the team conducted inspection at Depot, Stations and other major project locations. The team was led by Arvind Kumar Jain, Commissioner of Metro Rail Safety (CMRS), Central Circle, Mumbai and a senior IRSE official. Maha Metro officials led by MD Dr Brijesh Dixit briefed the team about the project.


The other members of the team were G P Garg and E Srinivas, both Deputy CMRS. The team started inspection from MIHAN Depot and inspected all facilities provided there. The team inspected the Depot, rolling stock. The team checked various safety-related parameters, including front door evacuation, emergency and rescue mechanism. This was followed by inspection of the Depot Control Centre.


The emergency services like fire alarm, automatic gate closure were personally checked by the team. It was given a demonstration on safety aspects. The officials also talked to the officials and employees posted there about the facilities provide there. Apart from rescue machinery and alarm system installed at the station, it also checked the surveillance system installed there.

The team of officials conducted inspection at the Airport Metro Stations, Sitabuldi Interchange. During course of inspection, the CMRS team also checked track and traction system along the route. The two officials, accompanied by senior officials from Maha Metro Nagpur, also inspected track and traction between the three stations.

The officials moved on trolley from Airport Metro Station to Sitabuldi Interchange. During the station visit, the officials checked Automatic Fare Collection (AFC), Signaling & Telecom System and other major features. From Interchange Station, the CMRS team, along with Metro officials, boarded the Metro Train to travel to Airport South Station.


The three-member team was also given a detail presentation on the overall progress achieved by the Nagpur Metro Project. Maha Metro’s commitment to a green metro was reiterated today, when the CMRS team and Maha Metro officials planted sapling at MIHAN Car Depot. After its return, the team would submit its compliance report. The team expressed its satisfaction at the overall progress, achieved by the Nagpur Metro Project.

Today’s visit and the team’s compliance report holds significance as this would eventually pave way for launching of the passenger services. Senior Maha Metro Nagpur officials including Director (Project) Mahesh Kumar, Director (Rolling Stock and Systems) Sunil Mathur, Executive Directors (RS) Janak Kumar Garg, Executive Directors (Signaling & Telecom) V K Agrawal, Sr CPM (Reach-I) Devendra Ramtekkar, GM (Administration) Anil Kokate and other senior officials accompanied CMRS team during inspection.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.