जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे.
मूल तालुका काँग्रेस तर्फे कार्यकर्ता बैठक संपन्न.
मूल/प्रतिनिधी :--
आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मुल येथे मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, तथा माजी आमदार हे होते तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत हे होते प्रमुख अतिथी म्हणून मूल तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष घनश्याम येनुरकर, पंचायत समिती सदस्य संजय मारकवार, बाजार समिती उपसभापती संदीप कारमवार, बाजार समिती संचालक राकेश रत्नावार, काँग्रेसचा महीला आघाडी अध्यक्ष रुपाली संतोषवार, किसान काँग्रेसचे रुमदेव गोहणे, ओबिसी सेल चे अध्यक्ष गुरुदास चौधरी, अध्यक्ष काँग्रेस ओ बी सी सेल मुल, मा. युवक काँग्रेस अध्यक्ष पतन निलमवार अध्यक्ष युवक काँग्रेस कमेटी मुल मा. काँग्रेस सेवादल अध्यक्ष पंकज पुल्लावार, अध्यक्ष, काँग्रेस सेवादल, मा. मूल शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, बाजार समिती संचालक डॉ. पद्माकर लेनगुरे, शांताराम कामडी, अनिल निकेसर, गणेश खोब्रागडे आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना श्री. सुभाषभाऊ धोटे म्हणाले, काँग्रेस एक विचार आणि आचार यात एकवाक्यता ठेवून चालणारा पक्ष आहे. देशाच्या विकासात पक्षाने भरीव योगदान दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात पक्षाची मजबूत पकड राहिली आहे. मात्र भाजपाच्या खोट्या प्रचाराला बळी पडून आमचा परंपरागत तसेच नव मतदार आपल्या पासुन दूर गेला मात्र मागील पाच वर्षांत त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्या सर्वांना काँग्रेसच्या विचारधारेशी पून्हा जोडण्यासाठी आणि वर्तमान सरकारच्या फसवणूक, पिळवणूक, शोषण, भ्रष्टाचारापासून त्यांना मुक्त करण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन केले. या प्रसंगी मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मुल तालुका काँग्रेस आणि बल्लारपूर विधानसभा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
डाॅ.पद्माकर लेनगुरे संदीप कारमवार ललीत मोहुर्ले शांताराम कामडी अनिल निकेसर गणेश खोब्रागडे हे उपस्थितीत होतो