Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०३, २०१९

4 ते 6 मार्च रोजी PSI STI /ASO या पदाच्या परीक्षेसाठी कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर/प्रातिनिधी:
Image result for exam
 चंद्रपूर जिल्हयामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या मिशन सेवा प्रकल्प व द युनिक ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पीएसआय, एसटीआय व एएसओ या पदासाठी होणा-या संयुक्त पूर्व परिक्षेसाठी तीन दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर कार्यशाळा प्रिदर्शनी इंदीरा गांधी सभागृह येथे दिनांक 4 ते 6 मार्च 2019 या कालवधीत आयोजित केली. या कार्यशाळेला महाराष्ट्रात अग्रक्रमी असलेल्या द युनिक ॲकॅडमी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये द युनिक ॲकॅडमीचे केंद्र प्रमुख बापू गायकवाड, वैभव राऊत, संतोष शिरगावकर, राहुल नव्हते, किरणे वानखडे, मिलींद पाटील इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा जिल्हयातील स्पर्धा परीक्षा तयारी करणा-या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व द युनिक ॲकॅडमी यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मिशन सेवा व द युनिक ॲकॅडमी यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी कळविले आहे.

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यशाळेतून आगामी मेगा भरतीसाठी मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.