खापरखेडा/प्रतिनिधी
सावनेर तालुक्यातील दहेगाव रंगारी येथे असलेला रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपची चोवीस लाख सात हजार तीनशे विस रुपयाची रोकड लुटल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार दहेगाव रंगारी येथे असलेला रिलायन्सच्या पेट्रोल पंप वर मागील तीन दिवसाची कॅश चोवीस लाख सात हजार तीनशे विस रुपये जमा होती रिलायन्स पेट्रोल पंप वरून मॅनेजर किशोर माटे याने काम रेडिनेट कॅश मॅनेजमेंट कंपनीकडून कॅश जमा करण्याकरीता आलेल्या राकेश तागडे वय २४ याला कॅश मोजून दिली राकेश हा कॅश घेवून बँक ऑफ इंडिया शाखा मानकापूर नागपूर येथे जमा करण्या करिता नागपूर दिशेने नियमितपणे होंडा शाईन क्र एम.एच.४९ डब्लू.१२०२ ने निघाला पेट्रोल पंप पासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर रस्त्यात हॉटेल आशियाना समोर दडून बसलेले चार आरोपी यांनी राकेश गाडीवरून येत असल्याचे दिसताच चारही आरोपी यांनी तोडला दुपट्टा बाधून धारधार शस्त्र हातात घेवून रस्त्यावर आले राकेशला चालत्या गाडी वरून थांबवले चारही आरोपींनी राकेश ला धमकावले व मानेवर मोठा चाकू ठेवून ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली व या दम्यानआरोपी यांनी राकेशच्या हातात असलेली रोकड रक्कम बॅग घेऊन व मोबाईल घेवून आरोपी नागपूर दिशेने ठेवलेली पल्सर व अॅक्टिवा घेवून नागपूर दिशेने घेऊन फरार झाले या दरम्यान परिसरात हडकंप उडाला आजूबाजूच्या नी आरडओरडा सुरु केला घटनेची माहिती खापरखेडा पोलिसाना मिळताच घटना स्थळ गाठले व अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटना आरोपीचा तपास सुरु केला