नागपुर/प्रतिनिधी :-
नागपुर शहराच्या फुटपाथवरील बेघर, निराधारांना निवा-याची चांगली सोय उपलब्ध होवून, त्यांचं जगणं सुसह्य व्हावं, यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत नागपुर महानगरपालिका, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अझीझ शेख तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
शहरी बेघर निवारा, हंसापुरी प्राथमिक व माध्यमिक शाळा, टिमकी, भानखेडा येथे युनाईटेड कलर्स ऑफ़ बेनेटन (UCB Brand) व क्लॉथ बॉक्स फॉउन्डेशन द्वारे सामाजिक बांधिलकीतून या बेघर नागरिकांना कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ब्रँडेड कपडे मिळाल्याने बेघरांनी आनंद साजरा केला. आनंद व उत्साहाच्या या दृश्याने उपस्थितांचेही मन सुखावून गेले. यावेळी बेघर नागरिकांसह समाजभान जपणारे USB कंपनी तसेच निवारागृहाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.