चिमूर/रोहित रामटेके
- उपजिल्हा रुग्णालय, चिमुर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये नेहरू ज्युनिअर कॉलेज तसेच सिनिअर कॉलेज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विधालय ,आयटीआय या कॉलेज मधील विदयार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी या मिनी मॅरेथॉन ला उपविभागीय
अधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्या हस्ते विदयार्थ्यांच्या मॅरेथॉन ला हिरवी झेंडी दाखवून या मिनी मॅरेथॉन ची सुरुवात करण्यात आली. व विदयार्थिनिंच्या मॅरेथॉन ला वैधकिय अधिक्षक डॉ.गो.वा. भगत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.हि स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉन मध्ये विदयार्थिनी मध्ये प्रथम कु.मोनाली ढोक तर विदयार्थी मध्ये प्रथम कु.आकाश दोहतरे आले. या विजेत्या झालेल्या स्पर्धकांना रोख बक्षिसासह प्रमाणपत्र व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाची शोभा वाढविण्याकरिता प्राध्यापक तसेच विदयार्थ्यांचे शिक्षक , उप जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.गो.वा.भगत , डॉ.अश्विन अगडे , डॉ.मेश्राम , सुमंत पंगंट्टीवार ,मंगरुळकर , प्रा.दांडेकर , लॅब टेक्निशिअस सुमेघ साखरे , कामिनी हलमारे मॅडम ,माधव बाणडेबूचे, पोपट, नर्सिंग स्टॉप व आदिंची यावेळी उपस्थिती होती.