सिंदेवाही /प्रतिनिधी
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या सामाजिक संस्थेअंतर्गत चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अडेगाव (देश) येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान विषयाची भीती दूर व्हावी या उद्देशाने विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उपस्थित सर्व पाहुण्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आणि जीवन जगताना विज्ञानाची का आवश्यकता आहे याविषयी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या मेळाव्यात चिमूर तालुक्यातील 6 शाळेतील एकूण 60 विद्यार्थी सहभागी हवा पाणी ,अग्नी ,आकाश आणि पृथ्वी या पंचतत्व आधारित एकूण 30 विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण केले. सर्वानी मुलानी तयार केलेल्या प्रयोगची पाहणी करून मुलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सौ अनिता पेंदाम उद्धाटक अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप देहारे, मार्गदर्शक श्री रंदे सर , श्री कांबळे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा बामणी, प्रमुख पाहुणे श्री चौधरी सर , श्री संजय चौधरी सरपंच अडेगाव , श्री बोरकर सर विज्ञान शिक्षक मदनापूर, आरोग्य सेविका सौ कर्नाडे उपस्थित होते. शाळेतील शिक्षक, माता पालक स्वयंसेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रथम चे जिल्हा प्रमुख विनोद ठाकरे यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर श्रीरामे आणि आभार भूषण निशाणे यांनी केले. हा मेळाव्या करिता गावातील स्वयंसेवक शाळेतील शिक्षक,विद्यार्थी ,माता पालक उपस्थित होते