मायणी, ता.खटाव जि.सातारा
२५/१५ योजने अंतर्गत विविध ग्रामविकास येजनेतुन मा.पंकजा ताई मुंडे यांच्या मुळे पंचायतील विकास साठी १कोटी३५लाखचा निधीतून मोरळे गावा साठी कार्यतत्पर स.युवानेते सचिन गुदगे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता सिमेंट बंदिस्त गटर रामोशी वस्ती वरील मंदिराच्या परिसरात सभामंडप या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शुभारंभ प्रसंगी बोलताना युवानेते कार्यतत्पर स.सचिन गुदगे म्हणाले मोराळे हे व्यवसायीक द्रष्ट्या सदन गाव आहे येतील युवकांनी नोकरीच्या मागे न लागला देशाच्या कानाकोपऱ्यात जावुन स्वतःचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायातुन सामाजिक बांधीलकी म्हणून त्यांनी अनेक समाजपयोगि कामे गावात केली याचा मला सार्थ आभिमान आहे.
मोराळे गावाने मला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत६०%मतदान मला दिले परंतु थोडक्यात माला अपयश आले म्हणून मी खचुन न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे विकासात गरुड भरारी घेतली येथील ग्रामस्थांना या पुढे जिल्हा परिषद सदस्य व आमदाराकडे विकासासाठी जावे लागणार नाही या पुढील काळात मोराळे गावचा अनुशेष भरून काढणार असे स्पष्ट मत मोराळे गावच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना युवानेते सचिन गुदगे यांनी व्यक्त केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर होते प्रसंगी मोराळे येथील रामोशी वस्ती येथील मंदिराच्या परिसरात सभामंडप कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
आपल्या प्रास्ताविक भाषणात मोराळे गावचे मा.उपसपंच शिवाजी शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्याचा व केलेल्या विकास कामाचा आढावा घेऊन मान्यवरांचा सत्कार केला मोराळे चे सामाजिक कार्यकर्ते पै.सुरेश शिंदे(पाटील)यांनी सचिनभाऊ गुदगे याचा मोराळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मंत्राच्या पातळीवर विनाविलंब सोडवल्याबदल जाहीर सत्कार केला.
आपल्या अध्यक्षय भाषणात डॉक्टर म्हणाले केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हे सामन्य माणसाच्या हिताचे सरकार व जिवन समृद्धाकरणारे सरकार असुन भाजप सरकारच्या माध्यमातून आम्ही अनेक विकास कामे खटाव माण भागात आणण्यात यशस्वी झालो आहोत भाजपचे सरकार हे जनतेचे सरकार असुन गेल्या५५वर्षात जे घडले नाही ते या सरकारने५५महीन्यात करून दाखवले आपण या सरकार च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे यांनी मोराळे ता.खटाव या गावच्या विकास कामाच्या शुभारंभ वेळी बोलताना आपल्या अध्यक्षस्थानी भाषणात व्यक्त केले
यावेळी प्रा.दिलीप पुस्तके यांनी आपल्या भाषणात म्हणाले आता माजी आमदार यांच्या पुढे माजी हा शब्द काडुन टाकण्याची वेळ आली आहे विकास कामे पुर्ण करण्याच्या पाठिमागे राहिले पाहिजे नुस्ते नार फोडणारा विकास करून शकत नाही असा टोला विरोधकाला लावला
या कार्यक्रमास सरपंच प्रतिनिधी अप्पासो शिंदे, पै.सुरेश शिंदे, देवस्थान ट्रस्ट आत्माराम शिंदे, दिलीप शिंदे, उपसरपंच प्रकाश शिंदे, शिवाजी शिंदे, दत्तात्रय थोरात, रामरावशेठ शिंदे, गणेश शिंदे, शिवदादा शिंदे, अभिजीत माळी,हरीदास शिंदे, अजय गुंजले,सुरेश थोरात, सुरेश पाटोळे, आप्पा पाटोळे, नारायण जाधव,हारीश्चंद्र पाटोळे,संजय जाधव,दादासो पाटोळे, पोपट जाधव,नारायण जाधव,महाराज जाधव,बापुसाहेब बागडे महाराज,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी शिंदे यांनी आभार मानले