Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १९, २०१९

सोयी-सुविधांसाठी पूर्ण ताकदीने काम करणार


ना.सुधीर मुनगंटीवार

विदर्भ हाऊसिंग सोसायटी कार्यक्रमात पालकमंत्र्यांची ग्वाही


चंद्रपूर दि १९ फेब्रुवारी : कोणतेही सार्वजनिक काम असो, उपक्रम असो वा निवडणूक असो राहुल पावडे यांच्या नेतृत्वात या भागातील नागरिकांनी कायम आपली पाठराखण केली आहे. त्यामुळे या नागरिकांच्या सर्व सोयी सुविधांच्या संदर्भातील मागण्या पूर्ण केल्या जातील. पाठीशी उभे राहणाऱ्या नागरिकांना त्या बहाल केल्या जातील, असे भावपूर्ण उद्गार राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांचा प्रभाग असणाऱ्या विदर्भ हाउसिंग सोसायटी नगिनाबाग या भागात अनेक कामांचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे महापौर अंजलीताई घोटेकर उपमहापौर अनिल फुलझेले सभापती ब्रिजभूषण पाझारे नगरसेविका वंदना तिखे सविता कांबळे प्रशांत चौधरी व महानगरपालिकेचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी या भागातील नागरिकांनी कोणत्याही निवडणुका असुदे कोणतेही उपक्रम असू दे प्रत्येक वेळी आपल्या शब्दाला मान दिला आहे. आपल्या एका हाकेवर या भागातील नागरिकांनी आपली पाठराखण केली आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपण विराजमान असून याबद्दल आपल्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे .त्यामुळे या परिसरातील जनतेने ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या आपण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

या परिसरातील विकास कामांमध्ये कुठलाही खंड पडणार नसून आगामी काळातही मोठ्या प्रमाणात विकास कार्य सुरू राहील असे, आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांत झालेल्या विकास कामांचा आढावा सादर केला.

ते म्हणाले की ,कधी काळी चंद्रपूर हा दुर्लक्षित भाग होता .मात्र आता चंद्रपूरची ओळख ही प्रयोगशील जिल्ह्याची झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहत असून त्यातच त्याच्या मदतीने मध्य भारतातील भव्य कॅन्सर हॉस्पिटल उभे राहत आहेत. देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, वन अकादमी, कौशल्य विद्यापीठ उभे राहात आहे. बाबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राद्वारे मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे. आपल्या जिल्ह्यातील एक हजार आदिवासींनी 86 लक्ष नफाच्या एका कंपनीची नुकतीच वार्षिक बैठक घेतली आहे. आपल्या बांबू प्रशिक्षण केंद्रात तयार झालेला सहा फुटाचा तिरंगा झेंडा पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री एवढेच नव्हे तर सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घरी देखील पोहोचला आहे.

महानगरांमध्ये अमृत योजनेच्याद्वारे आपण पुढील पंचवीस वर्षाच्या पाणीपुरवठ्याची सोय केली आहे. ईरई नदीवर देखना ब्रिज होत आहे. महांकाली मंदिराचे लवकरच भव्य रूप प्रत्यक्षात उतरणार आहे. अतिशय सुंदर असा मंदिर परिसराचा विकास येणाऱ्या काळात चंद्रपूरकर जनतेला अनुभवायला मिळणार आहे. चंद्रपूरची नवी ओळख होऊ पाहणाऱ्या या माता महाकाली मंदिराच्या आराखड्याला नागरिकांनी आपल्या सूचनेनुसार तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. या सगळ्या विकासामध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले .

यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील संबोधित केले. ते म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शहरातील विकास झपाट्याने होत असून या परिसरातील सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या जातील . जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम घोंगडे यांनी 6 हजार कोटीपेक्षा अधिक निधी जिल्ह्यामध्ये नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात प्राप्त झाला असून आतापर्यंत कधी नये इतका निधी या जिल्ह्याला मिळाला आहे. विकास कामांमध्ये कुठलीही अडचण राहिलेली नाही. या शहराचे उत्तम व्यवस्थापन व्हावे, यासाठी वेगवेगळ्या उपायोजना नामदार मुनगंटीवार यांच्या मार्फत करण्यात येत असून त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थायी समितीचे सभापती व या कार्यक्रमाचे आयोजक राहुल पावडे यांनी केले.निवडून आल्यानंतर नामदार मुनगंटीवार यांनी जवळपास पाच कोटीची कामे या वार्डात केले जातील असे सांगितले होते. मात्र एका वर्षातच पावणेचार कोटी रुपयांच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आणखी मोठ्या प्रमाणात निधी या प्रभागाला मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.