शासकीय आय टी आय मुलींची येथील प्रकार
चंद्रपूर- स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची ) चंद्रपुर येथील आदिवासी मुलींचे वसतिगृहातील पाणीपुरवठा मागील पंधरा 15 दिवसापासून बंद असल्याने तेथील वास्तवास असलेल्या आदिवासी मुलींची पाण्याकरिता इतरत्र भटकावे लागत आहे .त्यामुळे मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकाच संस्थेचा कार्यभार दोन प्राचार्य कडे आहे।त्यामुळे चर्चेत राहणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींचे पुन्हा एकदा परिसरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील राहणाऱ्या मुलींच्या पिण्याच्या पाण्याचा समस्यामुळे चर्चेत आहे.वारोंवर येथील प्राचार्य यांहा मौखिक व लेखी तक्रार करून ही प्राचार्य यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रशिक्षणार्थी मुलींमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी ने आय टी आय ला भेट दिली असता परीसरातील लाइट बंद होते त्यामुळे तिथे अंधार पसरलेला होता.मुलींचा वसतिगृहाची जवाबदारी ज्या वसतिगृह गृहपाल कडे आहे त्या मागील 3 दिवसापासून बाहेरगावी गेल्याचे प्रशिक्षणार्थी कडून सांगण्यात आले.मुलींच्या सुरक्षतेची जवाबदारी फक्त एकच पुरूष सुरक्षारक्षका वर असल्याचे दिसून आले.सदर वस्तीगृहहे संस्थेते शिकणाऱ्या आदीवासी प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी यांच्या करिता असून सुमारे 50 प्रक्षिणार्थी वास्तवास आहेत. अनेक समस्या नि ग्रस्त या वसतिगृह मध्ये मागील 15 दिवसापासून पिण्याचे पाणी पुरवठा बंद असल्यामुळे प्रशिक्षणार्थी कडून वारोंवर पाठपुरावा करून ही प्राचार्य यांनी ही समस्या न सोडवल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. प्रशिक्षणार्थी यांहा रोज सकाळी संध्याकाळी संस्था परिसर बाहेर सार्वजनिक बांधकाम विभाग च्या क्वार्टर मध्ये पाणी आणावे लागते.