मोबाईल वापरण्याच्या वादातुन भावासोबत झालेल्या भांडणामूळे निराश झालेल्या बहीणीने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हदयद्रावक घटना मूल येथील वार्ड क्र. 5 मध्ये घडली. मतकाचे नाव समिक्षा शरद भोयर वय 16 वर्षे असुन सदर घटना काल ता.18 ला घडली. मात्र, आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
येथील वार्ड क्र.5 मधील रहिवासी असलेले शरद भोयर यांची समिक्षा ही मुलगी आहे. पोलीसांकडे नोंदविलेल्या फिर्यादीनुसार काल ता. रात्री साडे दहा वाजता दरम्यान भोयर यांची मोठी मुलगी लघुशंकेकरीता उठली असता लहान बहीण समिक्षा आपल्या बाजुला तसेच समोरील छापरीत झोपलेली आढळली नाही. तेव्हा आई—वडीलांना उठवुन समिक्षा घरी नसल्याची माहिती दिली. धास्तावलेल्या आई—वडीलांनी सुरूवातीला आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला मात्र त्यांना समिक्षा भेटली नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात मुलीला पळवुन नेल्याची तक्रार दिली. पालकांच्या तक्रारीवरून पोलीसांनी कलम 363 अन्वये गुन्हा नोंद केला. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास भोयर कुटुंबिय समिक्षाचा शोध घेत असतांना त्यांच्या घरा जवळील विहीरीतील पाण्यात समिक्षाचे शव तरंगतांना दिसुन आले. पोलीसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनेची मर्ग नोंद घेऊन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे यांचे कडे सोपविला.
मोबाईल वापरण्यावरून समिक्षा आणि तिच्या भावात भांडण झाले. भावासोबत झालेल्या भांडणाच्या समिक्षाच्या मनावर अधिकच परीणाम झाल्याने तीने आत्महत्येच्या निर्णय घेतला असावा अशी परीसरातील शेजार्यांमध्ये चर्चा आहे.